Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बाहुबली' चित्रपट आता मराठीत, या चित्रपटाशी 'हे ' कलाकार जुडणार

'बाहुबली' चित्रपट आता मराठीत, या चित्रपटाशी 'हे ' कलाकार जुडणार
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (13:31 IST)
दिगदर्शक एस.एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंत केले होते आणि हे चित्रपट प्रचंड गाजले होते. या चित्रपटाची निर्मिती साठी लागणारे उच्च तंत्रज्ञान,  व्हीएफएक्सचा वापर, भले मोठे सेट्स,बाहुबलीला यशस्वी करण्यासाठी प्रमुख होते. आता 'शेमारू मराठीबाणा' ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे मराठीत बाहुबली घेऊन येत आहे. प्रवीण तरडे यांनी या मराठी चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाशी अभिनेते आणि डॉ.अमोल कोल्हे असणार. यांचा सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी,  उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे जुडणार असून ह्यांनी आपले आवाज या चित्रपटात दिले आहे. बाहुबलीसाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला आवाज दिला आहे. तर देवसेनासाठी सोनाली कुलकर्णी ने आवाज दिला आहे. लेखन कार्ये स्नेहल तरडे यांनी केलं आहे. 
 
या चित्रपटाला कौशल इमानदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीत लेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी,  अस्मिता पांडे यांनी केलं आहे. 
 
आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. बाहुबलीचा हा मराठमोळा अंदाज कसा असणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेक करायचा आहे