Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रपट ‘चौक’ 19 मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (08:22 IST)
social media
५ मे ला प्रदर्शित होणारा ‘बलोच’ आणि १२ मे ला प्रदर्शित होणारा ‘रावरंभा’ या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित चौक या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची १२ मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होईल.

मराठी चित्रपटांमधील स्पर्धा टळावी यासाठी या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड, निर्माते दिलीप लालासाहेब पाटील आणि ‘चौक’च्या सर्व टीमने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेण्याचे ठरवले.
 
यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की, ‘आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची १२ मे ही तारीख बदलून आता १९ मे करण्यात आली आहे. त्यामुळे १९ मे ला हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच बघा!’
 
तर प्रविण तरडे म्हणाले की, ‘इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दया याने त्याचा चौक हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!’
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त चौकच्या टीमने केक कापत आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी तारीख पुढे घेण्याची घोषणा केली. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, स्नेहल तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, चित्रपटाचे मार्केटिंग हेड विनोद सातव व‌ आदी मान्यवर उपस्थित होते. आता चौक हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली

Paani Trailer:पाणी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Bigg Boss 18 Premiere: आज होणार 'बिग बॉस 18' चा भव्य प्रीमियर,शो कधी पाहायचा

अमिताभ बच्चन यांनी KBC 16 च्या मंचावर पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांचे स्वागत केले

कुष्मांडा देवी मंदिर कानपूर

पुढील लेख
Show comments