Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (15:50 IST)
प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही ५ अॅागस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
 
सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे व विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहयला मिळणार आहे. वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या बेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून पुढील भागही लवकर प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक स्वरूपात यात दाखवण्यात आले आहे. ‘मी पुन्हा येईन’हा वेबसीरिज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.’’
 
प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली असून या वेबसीरिज मध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुढील लेख
Show comments