Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेझॉन प्राईमतर्फे ७ मे रोजी 'फोटो प्रेम' या आगामी मराठी चित्रपटाचा प्रिमिअर; उत्कंठावर्धक ट्रेलरच्या माध्यमातून घोषणा!

Webdunia
सोमवार, 3 मे 2021 (15:42 IST)
मुंबई: अमेझॉन प्राईम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात ७ मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. या वेळी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्याचप्रमाणे अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
 
'फोटो प्रेम' ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे आणि आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी तो संयुक्तपणे लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
 
या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.
 
या चित्रपटाबद्दल सांगताना नवोदित दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले, “फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे आणि प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची कथा वाटेल. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडियोशी सहयोग केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण त्यामुळे मराठी प्रेक्षकांसोबतच भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकेल.  
 
अलीकडेच आमचा ‘पिकासो’ हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या यशाच्या आनंदाचा आम्ही आस्वाद घेत असतानाच आता या स्ट्रीमिंग सर्व्हिसवर आम्ही 'फोटो प्रेम' हा आमचा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. मराठी भाषेत अत्यंत दर्जेदार चित्रपट अलीकडे प्रदर्शित होत आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आणि 'फोटो प्रेम' हीसुद्धा त्याच शृंखलेमधील पुढील कलाकृती असेल, असा मला विश्वास आहे.”
 
दिग्गज कलाकार आणि मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या, “'फोटो प्रेम' ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली गेली पाहिजे. हा चित्रपट सर्वांना पाहावा असा आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही हा चित्रपट तयार केला तेवढेच प्रेक्षकांचेही प्रेम या चित्रपटाला लाभेल, अशी मला आशा आहे.”
 
सारांश:
एका अंत्यविधीला गेलेल्या माई या गृहिणीला जाणवते की अशा परिस्थितीत लोकांना मृत व्यक्तीचा एक फोटो हवा असतो, जो त्याच्या/तिच्या स्मरणार्थ लावता येऊ शकेल. तिला जाणवते की, तिला फोटो काढण्याविषयी एक प्रकारची भीती असल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर लावायला तिचा एकही चांगला फोटो नाही. त्यामुळे तिला वाटते की, तिच्या मृत्यूनंतर ती विसरली जाईल कारण फोटो नसेल तर ती कशी होती हे कुणालाही कळू शकणार नाही. त्यानंतर, आपली कॅमेऱ्याची भीती घालविण्यासाठी आणि चांगला फोटो काढून घेण्यासाठी ती प्रयत्न करू लागते. अखेर, तिचे व्यक्तिमत्व दर्शविणारा फोटो तिला मिळेल का? आणि लोकांना त्या फोटोमधून तिच्याविषयी आपुलकी वाटेल का?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

राजकारणात ही मान-अपमान, 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मजेदार गोष्टी शेअर केल्या

प्रसिद्ध गायक शान यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग

ख्रिसमस बजेटमध्ये साजरा करायचा आहे, या ठिकाणांना नक्की भेट द्या

पुढील लेख
Show comments