Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१७ एप्रिलला उलगडणार 'मिरांडा हाऊस'चे रहस्य

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2019 (12:05 IST)
सर्वत्र आयपीएल, मतदानाचे गरमागरम वारे वाहात असतानाच आता प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढवण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक 'मिरांडा हाऊस' हा रहस्यमय चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयरिस प्रॉडक्शन निर्मित, मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून यात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. त्यामुळे अनेक तर्कवितर्कही काढले जात आहेत. मात्र येत्या १७ एप्रिल रोजी या 'मिरांडा हाऊस'चे हे रहस्य अखेर उलगडणार आहे. इंग्रजी सबटायटलसह हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून मोठ्या विकेंडचे औचित्य साधून हा चित्रपट दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे.
 
या आधी राजेंद्र तालक यांनी 'सावली', 'सावरिया.कॉम', 'अ रेनी डे' यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध प्राचीन जुने कॅथोलिक चर्च भोपाळ

मलायका अरोराच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये पोहोचले अरबाज खान

पुढील लेख
Show comments