Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता होणार पुन्हा झिम्मा’ 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग प्रदर्शित

Webdunia
सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (21:23 IST)
बायकांच्या मनात काय सुरु असते, याचे उत्तर मिळणे जरा अशक्यच आहे. त्या कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता 'झिम्मा २'मध्ये ही पाहायला मिळणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटातील उत्साहाने भरलेले टायटल सॉन्ग प्रदर्शित झाले आहे. या टायटल सॉन्गची धमालही चित्रपटाच्या कथेप्रमाणे डबल धमाकेदार झाली आहे. इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुन्हा झिम्मा' या बहारदार गाण्याची रंगतही आता डबल झाली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देणार आहे. यात दिसणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरच्या चेहेऱ्यावरच या चित्रपटातली धमाल कळुन येत आहे. गाण्याबद्दल संगीतकर अमितराज म्हणतात, '' या चित्रपटातील गाणी म्हणजे या चित्रपटातील या व्यक्तिरेखा आहेत. सगळीच गाणी करताना मज्जा आली. त्यांचे चित्रीकरणही कमाल झाले आहे. खरं सांगायचे तर 'झिम्मा २' ची गाणी बनवणे आमच्यासाठी खरंच आव्हानात्मक होते. त्यातही 'झिम्मा'चे टायटल सॉन्ग प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग करताना आमच्यावर तसे दडपण होते. कारण या गाण्याची पातळी 'झिम्मा २'मध्ये वर नेणे गरजेचे होते. त्यामुळे यात आम्ही काही नवीन घटकही समाविष्ट केले आहेत. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे ही गाणे झाले आहे. त्यात वैशाली सामंतने आपल्या अनोख्या आवाजाने हे गाणे अधिकच उत्स्फूर्त केले आहे. त्यामुळे 'झिम्मा २'चे टायटल सॉन्ग यावेळी तुफान झाले आहे.'' कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

मलायका अरोराच्या नवीन रेस्टॉरंटमध्ये पोहोचले अरबाज खान

Famous actor Govinda Birthday: अपघात होऊनही गोविंदाने शूटिंग रद्द केली नाही

पाण्याने दिवा जळतो असे रहस्यमयी माता भवानी मंदिर गाडियाघाट

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

पुढील लेख
Show comments