Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सातारचा सलमान'चे गाणे प्रदर्शित

Webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (13:26 IST)
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सातारचा सलमान' असे बोल असलेल्या या धमाकेदार गाण्यात सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे असे सगळेच कलाकार दिसत आहेत. प्रत्येकालाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले असून अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.
एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचा उत्स्फूर्त नाच आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आले आहे. या गाण्याचा एक गंमतीशीर किस्सा दिग्दर्शक हेमंत ढोमेने शेअर केला आहे. हे गाणे चित्रित करण्यापूर्वी हेमंतच्या डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणे खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्याने चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता. या चित्रपटाचे बरेच चित्रीकरण हे साताऱ्यातील गावांमध्ये चित्रित झाल्याने तिथे रंगीबेरंगी घरे दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतने गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचे ठरवले आणि गंमत म्हणजे हेमंतच्या या निर्णयावर गावकऱ्यांनीही संमती दर्शवली. अगदी गावकरी येऊन येऊन सांगत होते, माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या. अखेर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होते, ते गाण्यात उतरले. आजही साताऱ्यातील केंजळ या गावात गेल्यावर ही रंगीबेरंगी घरे पाहायला मिळतात.
 
टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित 'सातारचा सलमान' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments