Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
, शनिवार, 18 मार्च 2023 (09:54 IST)
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक आणि ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे कोल्हापुरात वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. पिंजरा, सोंगाड्या, नवरा नको गं बाई, मुंबईचा जावई, खतरनाक आणि थरथराट असे त्यांनी भूमिका साकारलेले चित्रपट आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या सह अभिनय केले .त्यांना कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना चित्रभूषण पुरस्कार आणि जनकवी सावळाराम पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shani Shingnapur: शिंगणापूरमध्ये खडकाच्या रूपात शनिदेव कसे प्रकट झाले, जाणून घ्या ही रंजक पौराणिक कथा