Dharma Sangrah

विकता का उत्तरमध्ये अवतरले 'नटसम्राट'

Webdunia
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (13:06 IST)
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीना उजाळा
 
'टू बी ऑर नॉट टू बी... ' हे शब्द कानावर पडताच, डोळ्यासमोर उभे राहतात ते 'नटसम्राट' ! थोरामोठ्यांपासून ते अगदी शाळकरी मुलांना अवगत असलेले हे नटसम्राट विविध रुपात आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक 'नटसम्राट' विकता का उत्तर या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. मुंबईचे ६४ वर्षीय गृहस्थ सुहास नार्वेकर यांनी साकारलेली नटसम्राटांची भूमिका अंगावर रोमांच उमटविणारी ठरणार आहे. आय. टी . कन्सल्टंट म्हणून अनेकवर्ष विविध शहरात त्यांनी काम केले होते, निवृत्तीनंतर ते सॉफ्टवेअर डेवलपमेंटचे काम करीत आहेत. प्रगल्भ वाचन आणि प्रतिभावंत असलेले सुहास नार्वेकर यांचे व्यक्तिमत्व रसिकांना भारावून टाकणारे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण त्यांनी सदर कार्यक्रमात शेअर केली.
 
१९९५ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुहास यांचा त्यांच्याशी परिचय झाला होता. त्यावेळी सुहास आय. टी. सेक्टरमध्ये कामाला होते. त्यादरम्यान सुहास आणि विलासराव देशमुखांचे आय.टी. संदर्भात काही बोलणे झाले होते. मात्र ही भेट अंशकालीन असल्याने विलासराव आपल्याला स्मरणात ठेवतील अशी कल्पना देखील सुहास यांना नव्हती. कालांतराने विलासराव देशमुख २००४ साली पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर रुजू झाले, मात्र त्याकाळात सुहास सेवानिवृत्त झाले होते. असे असले तरीही त्यांनी सुहास यांची जातीने दखल घेत एका सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या प्रमुख पदावर काम करण्याविषयी त्यांना घरी पत्र पाठवले होते. इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची ही संधी माझ्यासाठी स्वप्नच होते, अशी एक अविस्मरणीय आठवण सुहास यांनी सांगितली. आपल्या वडिलांची ही आठवण ऐकताना कार्यक्रमाचा होस्ट असणाऱ्या रितेशला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. रितेशनेदेखील आपल्या आठवणींना उजाळा देत त्याचे आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दलचे अनेक वेगळे पैलू मांडले. 'विकता का उत्तर' चा हा विशेष भाग यंदाच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. येत्या २, ३ आणि ४ डिसेंबर रोजी सादर होणारा हा भाग महाराष्ट्राच्या रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments