Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या १४ फेब्रुवारीला 'विकून टाक' प्रदर्शित होणार

Webdunia
येत्या ३१ जानेवारीला मराठीमध्ये 'विकून टाक', 'चोरीचा मामला' आणि इतर काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार होते. बॉक्स ऑफिसवर होणारी ही टक्कर टाळण्यासाठी या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपसी सहमतीने 'विकून टाक' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता 'विकून टाक' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा ट्रेण्ड अगदी सामान्य आहे. आता मराठी मध्ये देखील हा ट्रेण्ड रुजताना दिसत आहे.
 
या निर्णयाबद्दल बोलताना 'विकून टाक'चे निर्माते उत्तुंग ठाकूर म्हणाले, " 'विकून टाक' सिनेमातून आम्ही प्रेक्षकांना हसवता हसवता सामाजिक संदेशही देणार आहोत. चित्रपट बनवताना संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेऊन त्यांच्या कल्पनेतला सिनेमा प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करत असते.  एकाच दिवशी मोठे सिनेमे प्रदर्शित झाल्यास त्या चित्रपटांच्या व्यवसायाला त्याचा फटका बसतो. अशावेळी प्रेक्षकांनाही प्रश्न पडतो, की कोणता चित्रपट पाहावा? त्यामुळे आमचा हा निर्णय सगळ्यांसाठीच योग्य आहे.  मला वाटते प्रेक्षकही उत्सुकतेने या सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत. चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. आमच्या या निर्णयामुळे सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना आणि पर्यायाने चित्रपटसृष्टीला त्याचा फायदा होईल." 
 
'विकून टाक' या चित्रपटात शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवा इनएन प्रॉडक्शन, उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित'विकून टाक' या चित्रपटाला अमितराज यांनी संगीतबद्ध केले असून गुरु ठाकूर यांनी गीतकार म्हणून काम पाहिले आहेत. चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आणि चारुदत्त भागवत, समीर पाटील यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

पुढील लेख
Show comments