Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेलकम टू 'मिरांडा हाऊस'

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2019 (15:07 IST)
'मिरांडा हाऊस' या चित्रपटाच्या रहस्यमयी पोस्टर नंतर आता या चित्रपटाचा अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलर वरून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. पल्लवी सुभाष तिचा पहिला संवाद 'नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा' म्हणताना तिच्या डोळ्यातील आणि चेहऱ्यावरील अविर्भाव यातच तिचे अभिनयकौशल्य दिसते. चित्रपटाचा ट्रेलर बघताना जे संवाद कानी पडतात त्यावरून चित्रपट पंचमहाभूतांवर तयार केलेल्या चित्रांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे. सोबतच अनेक रहस्यांची उकल होतांनाही यात दिसणार आहे. 'वेलकम टू माय हाउस' हा संवाद ऐकताच मिलिंद गुणाजी यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटगृहापर्यंत नेईल यात वाद नाही. साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कारण त्याला आतापर्यंत आपण हलक्या फुलक्या भूमिकेत पहिले आहे. त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साईंकित या चित्रपटात साकारत आहे.
 
मुळातच मराठीमध्ये 'सस्पेन्स' या वर्गात बसतील असे चित्रपट कमी येतात. त्यामुळे असे उत्सुकता शिगेला नेणारे आणि वेगळ्या साच्यातले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडतात. या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील कलाकार. मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष आणि साईंकित कामत यांच्यासारखे कसलेले कलाकार आणि हटके विषय यामुळे हा चित्रपट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनत आहे. बऱ्याच दिवसांनी मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
१९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेंद्र तलक यांनी केले असून आयरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेंद्र तलक यांनी याआधी 'अ रेनी डे', 'सावरिया. कॉम', 'सावली' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'मिरांडा हाऊस हा चित्रपट मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

तुम्ही वर पिता का ?

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

संध्या थिएटर दुर्घटनेच्या वादात अभिनेता अल्लू अर्जुनच्या निवासस्थानाची तोडफोड

एकलिंगजी मंदिर उदयपुर

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

पुढील लेख
Show comments