Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'&' ची 'जरा हटके' रूपं

Webdunia
सोमवार, 27 जून 2016 (17:53 IST)
निर्मिती आणि दिग्दर्शकीय क्षेत्रात प्रत्येकवेळी काही तरी हटके करणारे रवी जाधव मराठी सिने सृष्टीत आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमाचे पोस्टर असो वा चित्रपट प्रदर्शनापूर्वीची प्रसिद्धी असो, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या या क्रिएटिव्हिटीची झलक आपल्याला पाहायला मिळते. त्यांची हीच क्रिएटिव्हिटी आपल्याला '& जरा हटके' या आगामी सिनेमाच्या पोस्टरमधून पाहायला मिळते. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांची निर्मिती असलेला सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. 
 
प्रकाश कुंटे दिग्दर्शित '& जरा हटके' या सिनेमाच्या पोस्टरवरील '&' या इंग्रजी मुळाक्षराच्या ग्राफिटींना सोशल नेटवर्किंग साईटवर मोठी पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या नावामध्ये केलेल्या अशाप्रकारच्या कलाकृतीला प्रेक्षकांकडून देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी मराठीत असा प्रथमच प्रयत्न करण्यात आला असून, प्रेम करावे पण जरा हटके या उपशीर्षकातून बरेच काही सांगू इच्छिणारा हा '&' सोशल साईटवर लोकांचे हटके मनोरंजन करताना दिसत आहे. 
 
मिताली जोशी लिखित या सिनेमात आपल्याला मराठी आणि बंगाली संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांची मुलं कसं स्वीकारतात याच चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.  '&'  हे मुळाक्षरचं मुळात  दोन भिन्न गोष्टींना जोडणारं असून नात्यांना पूर्णत्व देणार असल्यामुळे चित्रपटातील या मुळाक्षराला अधिक महत्व देण्यात आलंय. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनील सोबतच मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत.  नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments