Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नच बलिये ७ मध्ये पहिल्या तिघात मराठमोळी अमृता

Webdunia
मंगळवार, 14 जुलै 2015 (12:25 IST)
अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यानंतर नच बलियेची दुसरी मराठमोळी स्पर्धक ठरली ती अमृता खानविलकर. तिचा पती हिमांशू मल्होत्रा या दोघांनी नच बलियेमध्ये पहिल्या तिघात आपले स्थान निश्चित केले आहे. डान्सिंग क्वीन म्हणून तिची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर असली तरीही अमृताने तिच्या नाचतील नाविन्य नेहमी टिकवून ठेवलं आहे.  नच बलिये मध्ये तिने आणि हिमांशूने सादर केलेले एका पेक्षा एक डान्स फॉर्म्स परिक्षासोबत प्रेक्षकानाही खूप आवडले आहे. पैकीच्या पैकी गुणांची ती मालकीण आहे. मात्र या सगळ्यात हिमांशूने तिला खूप साथ दिली. त्याला डान्स काहीसा नवखा असला तरीही तासन तास प्रॅक्टिस करून त्याने देखील नाच उत्तम आत्मसात केला आहे. तिच्यावर सगळ्याच्याचकडून होणारा कौतुकाचा वर्षाव आणि त्यातून निर्माण झालेली त्या दोघांबद्दलची जबरदस्त क्रेझ अमेझींग आहे.  

सध्या या दोघांना ट्विटर, फेसबुक या सोशल साईट्समार्फत खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यावर अमृताने सगळ्यांचे आभार मानले असून या स्पर्धेत विजयी करण्यासाठी १८००२७४१००३ या क्रमांकावर मिस कॉल देण्यासाठी विनंती केली आहे. १२ ते १९ जुलै सायंकाळी ७ पर्यंत वोटिंग लाईन खुल्या राहणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच मराठी कलावंतांना भरभरून प्रेम दिलं आहे आणि देत राहतील. त्यात महाष्ट्राची लाडकी लेक आणि जावई देखील त्याला अपवाद नाही. तिची वाजले की बारा ही लावणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. त्याप्रमाणे नच बलियेमध्ये केलेले वेगवेगळे डान्स फॉर्म देखील तितकेच लोकप्रिय झाले आहे.  'भूलभूलैय्या'  सिनेमातील 'मेरे ढोलना सून'… या  गाण्यावर दिलेला परफॉर्मन्स अतिशय अप्रतिम आणि नेहमी लक्षात राहण्यासारखा होता. असे एका पेक्षा एक पर्फोर्मंस देत असताना बरीच धडपड देखील सहन केली आहे. रिहर्सल करताना अमृता तोंडावर पडली तर एकदा तिच्या पायाला दुखापतही  झाली होती. तरीही अमृताने डान्सला ऑन प्रायोरीटी ठेवून जी जान लावून  सादरीकरण केलं. तिने घेतलेल्या मेहनतीच फळ तिला नक्कीच मिळेल आणि ते मिळवून देण्यासाठी महारष्ट्रातील जनता तिच्या पाठीशी उभी राहील यात यात शंका नाही.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments