Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्लिन महोत्सवात मराठी 'किल्ला' सर

वेबदुनिया
WD
मुंबई : हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता मराठी चित्रपटांचीही कलात्मकता समृद्ध बनत चालली असून अशाच कलात्मक चित्रपटांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. 'फॅण्ड्री'पाठोपाठ आता अविनाश अरुण दिग्दर्शित 'किल्ला' चित्रपटाने ६४व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटासाठीचा 'क्रिस्टल बिअर' पुरस्कार पटकावला आहे. या महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय चित्रपटाने हा पुरस्कार जिंकला आहे.

' किल्ला' हा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलेला तिसरा मराठी चित्रपट ठरला आहे. 'जार पिक्चर्स'च्या बॅनरखाली मधुकर मुसळे, अजय राय, अँलन मॅक्अँलेक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २0१३मधील एनएफडीसी फिल्म बाजारच्या 'वर्क इन प्रोग्रेस लॅब'मध्ये अंतर्भूत होता. आपल्या चित्रपटाला लहानग्या मंडळींकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मी भारावून गेलो.

चित्रपट ज्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा, त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. आमच्या भारतीय संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बर्लिनचा मन:पूर्वक आभारी आहे, असे 'किल्ला'चे दिग्दर्शक अविनाश म्हणाले. ते सध्या निशिकांत कामतच्या आगामी चित्रपटासाठीच्या फोटोग्राफीचे दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. बर्लिनमध्ये झालेल्या सन्मानामुळे गुणात्मक चित्रपटाची निर्मिती करण्याचे वचन आणि आमचा विश्‍वास अधोरेखित झाला. वैश्‍विक व्यासपीठावर भारतीय चित्रपट सादर केल्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माता अजय जी. राय यांनी दिली. चित्रपटात 'विहीर'फेम अमृता सुभाष, अर्चित देवधर, पार्थ भालेराव (भूतनाथ रिटर्न्‍स) आणि श्रीकांत यादव यांची भूमिका असून हा चित्रपट भारतात मे महिन्यात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments