Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मकरंदच्या ‘रंगा पतंगा’चा ट्रेलर रिलीज’

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2016 (09:50 IST)
मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ या आगामी मराठी चित्रपटाचा पहिलावहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटात एका शेतकर्‍याची कथा मांडण्यात आली असून मकरंद अनासपुरे आणि संदीप पाठक यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाची पुणे येथील पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली आहे.
 
प्रसाद नामजोशी यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या या कलाकृतीत एका मुस्लिम शेतकर्‍ाची भूमिका मकरंद साकारतो आहे. वेगवेगळ्या रंगाच्या भूमिका केल्यानंतर आता मकरंदची ही भूमिका बघणेही सर्वासाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. तर संदीप पाठक याचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. 
 
यांच्यासोबतच या चित्रपटात नंदिता धुरी, सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दिक जोशी आणि आनंद कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
 
या चित्रपटाची कथा चिन्मय पाटणकर याने लिहिली असून प्रसाद नामजोशी यांचे संवाद आहेत. तर चित्रपटाला संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांची यात गीते आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments