Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मीना नाईक आणि मनवा नाईक पहिल्यांदाच एकत्र सिनेमात

Webdunia
सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (13:09 IST)
एकाच सिनेमात बाप आणि लेक, किंवा माय लेक दोघांनी एकत्रित काम करणं हा सध्या सिनेमाचा नवा ट्रेंड आहे. हाच ट्रेंड ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमानेही फोलो केलेला आहे. मार्केटिंग च्या दृष्टिकोनातून सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमात आपल्याला मीना नाईक आणि मनवा नाईक या दोघी माय लेकी पाहायला मिळणार आहेत. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते आणि त्यामुळेच कि काय प्रेमाला एका ठराविक व्याख्येत बांधता येत नाही. अशीच प्रेमाची अनोखी परिभाषा  ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा घेऊन येतोय.

निशांत सपकाळे दिग्दर्शित या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवटपर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीच्या नात्याला आजही तितकच पवित्र मानल जात. याचं माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा २१ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीना नाईक आणि मनवा नाईक या मायलेकीही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत.  

मीना नाईक या अभिनेत्री व कळसुत्रीकार असून त्यांनी 'वाटे वरती काचा ग' या नाटकाद्वारे बाललैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत.या चित्रपटात मीना नाईक भूषण प्रधान यांच्या आईची भूमिका साकारत आहेत.माणुसकीच्या नात्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपायला हवी असाही संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. एखाद्या प्रॉडक्टपुरतं मार्केटिंग मर्यादित नसतं तर त्याचा उपयोग आपण समाजाच्या हितासाठीही करू शकतो हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे.  चार्मी गाला हया सिनेमाच्या निर्मात्या असून लव्ह प्रोडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. उदयसिंग मोहिते यांनी छाया चित्रिकरणाची जबाबदारी पार पाडली आहे.  समीर साप्तीसकर आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत असून हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांनी सिनेमातील गीतांना स्वरसाज दिला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments