Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संगीत हेच सर्वस्व - लिटील चॅम्प्स

Webdunia
ND
' आज गाणं कसं होणारं याची धाकधूक नेहमीच मनात असते. पण, स्टेजवर येताच एक वेगळाच हुरूप येतो आणि गाणं कसं खुलून जातं. त्यानंतर पल्लवी ताई 'छान, मस्त झालं गाणं, म्हणत स्टेजवर येते आणि मन भरून जातं' हे बोल आहेत झी मराठीवर सुरू असणा-या सारेगम लिटिल चॅंप या स्पर्धेतील चिमुकल्या स्पर्धकांचे...

ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. अखेरच्या पाच स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी होणार आहे. चिमुकल्यांनी श्रोत्यांवर आपल्या सुरेल स्वरांची विलक्षण जादू घातली आहे. म्हणूनच विजेता कोण होणार? यापेक्षा स्पर्धा संपल्यानंतर चिमुकल्यांचा आवाजांना आपण मुकणार, याचेच धुकधूक प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आहे. ज्या कलाकारांनी संगीतकलेसाठी आयुष्य वेचले अशा दिग्गजांना अक्षरक्ष: नतमस्तक करायला लावावेत अशा ताकदीचे सादरीकरण या मुलांनी केले आहे. खरोखरीच सरस्वतीची देणगी लाभलेल्या या स्पर्धकांना या कार्यक्रमामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले आणि भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी ही चिमुकली सिद्ध झाली आहेत. संगीताप्रती या वयात असलेले त्यांचे भान, भक्ती आणि श्रद्धा खरोखरीच थक्क करणारे आहे. संगीतकलेबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला प्रत्येकजण संगीतमय झाल्याचे जाणवले... ती काय म्हणतात.. त्यांच्याच शब्दात...

आर्या समीर आंबेकर ( पुणे)
जन्म- 16 जून 1994

अभ्यासामध्ये हुशार असणारी आर्या म्हणते, गाण्यातील भाव लक्षात घेऊन गाणे सादर करण्याची समज मला या कार्यक्रमाने दिली आहे. संगीतक्षेत्रातली दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळत असल्याने आनंद होतो आणि आणखी चांगले करून दाखविण्याची प्रेरणा मिळते. या गुरुजनाकडून मिळालेले सल्ले आम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहेत. गाण्यासाठी रियाज करणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील उमगले. यापुढे जाऊन मी रियाजावर भर देणार आहे.
..................................

रोहित शाम राऊत ( लातूर)
जन्म- 18 नोव्हेंबर 1995

मनसोक्त भटकण्याची आणि चित्रकलेची आवड असणा-या रोहितला लहान वयातच असे व्यासपीठ मिळाल्याने तो स्वतः:ला भाग्यशाली समजतो. तो म्हणतो, चांगले गाणे आणि सादरीकरणाबरोबरच कॅमे-यासमोर आपले व्यक्तिमत्त्वही चांगले दिसले पाहिजे. जेव्हा लोक माझ्या गाण्याचे कौतुक करतात तेव्हा मी हुरळून जात नाही. प्रत्येकवेळी अधिक चांगले आणि वेगळेपण देण्याचा माझा प्रयत्न असतो. गाण्याबरोबरच अभ्यासही महत्त्वाचा आहे पण, सध्या तर मी गाण्यावरच लक्ष्य केंद्रित केले आहे.
..................................

प्रथमेश उमेश लघाटे ( माघझण)
जन्म- 29 सप्टेंबर 1994

रियॅलिटी-शोमुळे लहान वयातही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले जाते पण, आमच्या सुदैवाने सारेगम या कार्यक्रमाने आम्हाला या मृगजळापासून लांब ठेवले असे सांगताना प्रथमेश म्हणाला, शास्त्रीय बाज असल्याने प्रत्येकवेळी नवीन काही देताना टेग्शन येते. पण, आत्मविश्वासाने सादरीकरण करायचे आहे, एवढेच डोक्यात असते. आम्ही स्पर्धक असलो तरी आमच्यात स्पर्धा अशी काहीच नाही. एकमेकांच्या चुका सुधारण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो. भावाबहिणींप्रमाणे आमचे एक कुटुंब बनले आहे.
..................................

मुग्धा वैशंपाय न (अलिबाग)
जन्म - 5 एप्रिल 2000
अभ्यास, पोहणे, फिरणे आणि होर्मोनियम वाजविण्याची आवड असणा-या मुग्धाला या कार्यक्रमातून खूप काही शिकायला मिळाले, असे वाटते. ती म्हणते, येथे येऊन मी वेगवेगळ्या भाज्या खाण्यासही शिकले. पहिल्यांदा मला भेंडीची भाजी मुळीच आवडत नव्हती पण, येथे येऊन मी सगळ्या भाज्या आवडीने खाऊ लागले. मला अभ्यास आणि गाणे दोन्हीही तितकेच आवडते पण, गाण्यावर जास्त प्रेम आहे.
..................................

कार्तिकी कल्याण गायकवाड ( आळंदी)
19 नोव्हेंबर 1997
मला गाण्यामध्येच भविष्य घडवायचे आणि त्यामुळे मी शेवटपर्यंत संगीत शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. वडिलांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना सर्वदूर पसरविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला खूप खूप शिकायचेही आहे.
..................................

खालील रकान्यात आपली प्रतिक्रीया मांडण्यास विसरू नका...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments