Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय जाधव यांच्या 'तू ही रे' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2015 (17:18 IST)
दुनियादारी, प्यारवाली  लव्हस्टोरी या सुपरहिट सिनेमांनंतर बॉक्स ऑफीसवर संजय जाधव यांची आणखी एकफिल्म येण्यास सज्ज होत आहे. प्रेक्षकांना 'प्रेम', 'मैत्री' या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवणारे या सिनेमाच्यायादीत आणखी तू हि  रे या सिनेमाचं नाव दाखल होत आहे.  प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एका अनोख्याजगात नेलं तर दुनियादारीने मैत्रीची सफर घडवून आणली. आता तू हि  रे प्रेक्षकांना कोणत्या वळणा वर घेऊनजाईल याबाबत आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे.  मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये नुकतच संजयजाधव यांच्या आगामी तू ही रे सिनेमाचं ट्रेलर लॉच करण्यात आला. रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमाची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार,गिरीश ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या  या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्यारुपात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. आदर्श शिंदे, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर यांनी सिनेमाची गाणी तर गायली आहेत. सिनेमाची जान म्हणजेच कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे.प्रसाद भेंडे यांच्या कॅमेऱ्याची जादू यंदाही आपल्याला या सिनेमात दिसणार आहे.

करण एंटरटेनमेंटचे मृदुलापडवळ- ओझा, शीतल कुंमार-मानेरे, इंडियन फिल्म्स स्टूडिओचे आशिष वाघ आणि उत्पल आचार्य तसेच ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेवेनचे दिपक राणे यांच्यासह संजय घोडावत हे सहनिर्माते या सिनेमासाठी यंदा एकत्र आले आहेत. तू हि रे हा सिनेमा  ४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सगळ्यांनाच सिनेमाची उत्सुकता लागली आहे यात शंका नाही. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments