Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘धुरंधर भाटवडेकर’चा ट्रेलर

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (14:40 IST)
मोहन आगाशे, मोहन जोशी आणि किशोरी शहाणे या दिग्गजांच्या अभिनयाने सजलेला आगामी मराठी चित्रपट धुरंधर भाटवडेकर चा ट्रेलर नुकताच लाँच झाला. कोहिनूर बँक्वेट्स, प्रभादेवी, येथे पार पडलेल्या सोहळ्यात चित्रपटातील २ गाणी देखील लाँच करण्यात आली. दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
तरुणाईचा फेवरेट ऋषिकेश कामेरकरने या चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली असून गाण्यांचा बाज फ्रेश आहे. सोहळ्यात ऋषिकेश कामेरकरने सादर केलेल्या गाण्याला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
 
गाण्यासोबतच आमंत्रितांना चित्रपटाचा ट्रेलर पाहता आला. मोहन आगाशे, मोहन जोशी, आणि किशोरी शहाणे यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक असणा-या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. मोहन जोशी आणि मोहन आगाशे या दोन कसलेल्या अभिनेत्यांची पडद्यावरील केमेस्ट्री पाहणे म्हणजे मनोरंजक अनुभव ठरतो. या दोघांची ‘तू तू – मैं मैं’  पाहणं एक विनोदी ट्रीट ठरणार आहे.
 
या सोहळ्या विषयी बोलताना निर्माते देवदत्त कपाडिया म्हणाले, “ हा सिनेमा आमच्यासाठी फार जवळचा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आणणं आणि त्यांच्या सोबत काम करणं हा एकूणच खूप सुंदर अनुभव होता.  आम्हाला चित्रपटाच्या संहितेला साजेसं संगीत हवं होतं आणि ऋषिकेश कामेरकरने ते काम उत्तमरित्या पार पाडलं आहे.”
 
सिनेमाचं कथानक भिन्न स्वभावांची ३ मध्यवर्ती पात्रं आणि त्यांतील प्रेम त्रिकूटाभोवती फिरतं. हा सिनेमा मानवी स्वभावाच्या निरनिराळ्या पैलूंवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकतो. हलकं फुलकं कथानक, खळखळून हसवणारे विनोद, दिग्गजांचा अफलातून अभिनय यामुळे हा सिनेमा नक्कीच संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा मनोरंजनात्मक सिनेमा आहे.
 
मोहन आगाशे, मोहन जोशी, आणि किशोरी शहाणे सारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला ‘धुरंधर भाटवडेकर’ चे दिग्दर्शन क्षितीज झरापकर यांनी केले आहे. देवदत्त कपाडिया, ‘डिफ्रंट स्ट्रोक्स कम्युनिकेशन’ यांची निर्मिती असलेला हा धमाल सिनेमा येत्या २९ मे २०१५ ला प्रदर्शित होत आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments