Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल हैद्राबादची मालकी सन टीव्हीकडे

Webdunia
गुरूवार, 25 ऑक्टोबर 2012 (16:00 IST)
FILE
सन टीव्ही नेटवर्कने आयपीएल हैद्राबादची फ्रॅचायसी वर्षाकाठी ८५ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. याचसोबत डेक्कन चार्जर्सचा फ्रँचायसी करार रद्द झाल्यानंतर नवीन संघ शोधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आयपीएल संचालन परिषदेने बैठक बोलावून नवीन आयपीएल फ्रँचायसीच्या लिलाव घेतला, यामध्ये सन टीव्हीची बोली सर्वाधिक होती. बीसीसीआय सचिव संजय जगदाळे यांनी जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती देण्यात आली.

डेक्कन चार्जर्सचा करार १५ सप्टेंबरला रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने नवीन आयपीएल फ्रँचायसीसाठी निविदा जारी केली होती, मात्र या संघाची मालक कंपनी डीसीएचएल ने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

डेक्कन चार्जर्स होल्डिंग्स लिमिटेड १२ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत १०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ ठरल्यानंतर उच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या बाजूने निकाल दिला होता.

डीसीएचएलने सवौच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

डकवर्थ-लुईस नियमाचे सह-निर्माते फ्रँक डकवर्थ यांचे निधन

आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा बदल,या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

Show comments