Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारामतीचं नाव मोठं करा : सचिन तेंडुलकर

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2016 (12:30 IST)
बारामतीत तरुणाई आहे, ते डायमंड आहेत, त्यांना पॉलिश करण्यासाठी गाईड असतात. इकडे मेहनत करुन तुम्ही बारामतीचं नाव मोठं कराल, पण या स्टेडियमसाठी ज्यांनी मेहनत घेतली, जेवढं पाणी वापरण्यात आलं, त्याकरता तुम्हीही घाम गाळून मेहनत करा” असा सल्ला सचिन तेंडुलकरने बारामतीच्या तरुणाईला दिला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं उद्घाटन झालं. यावेळी सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेही उपस्थित होता.

यावेळी बोलताना सचिन म्हणाला, पवार साहेबांनी प्रेम आणि आदर दिला. त्यांच्याबद्दल किती बोलावं, ते कळत नाही. जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा माझं स्वप्न अनेक वर्षांनी साकार झालं, असं सचिनने नमूद केलं.
सचिननं औपचारिकरित्या या स्टेडियमचं उद्घाटन केलं.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यादेखील हजर होत्या. अनेक सुविधांनी सज्ज असलेलं हे स्टेडियम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या पेक्षा मोठं आहे. त्यामुळे इथंही लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

GG W vs UPW W: गुजरातने UP ला सहा गड़ी राखून पहिला विजय मिळवला

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

MI W vs DC W : दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला

सचिन तेंडुलकर या लीगमध्ये भारताचे नेतृत्व करतील, इतके संघ सहभागी होतील

महिला प्रीमियर लीग आजपासून सुरू, पाच संघांमध्ये जेतेपदाची लढाई,एकूण 22 सामने खेळले जातील

Show comments