Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ATP RANKINGS: दुखापतीमुळे रॉजर फेडररची क्रमवारीत घसरण, जोकोविच पहिल्या स्थानावर कायम

Webdunia
बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (14:45 IST)
माजी विश्वविजेता रॉजर फेडररची एटीपी क्रमवारीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यातच ते  टॉप-10 मधून बाहेर पडले होते. ताज्या एटीपी क्रमवारीत फेडरर 15 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. 40 वर्षीय स्वित्झर्लंडचे फेडरर बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे ते  2020 मध्ये एकही स्पर्धा खेळू शकले नाही. त्याच वेळी, 2021 मध्ये, ते  फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन खेळले . 7 जुलै रोजी ते विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या हुबर्ट हुरकाझकडून पराभूत झाले. 
 
याशिवाय इटलीच्या जॅनिक सिनरने लांब उडी घेत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 11व्या स्थानावर पोहोचले. रविवारी त्याने अँटवर्पमध्ये विजय मिळवला. या हंगामातील त्यांचे हे चौथे विजेतेपद ठरले. इंडियन वेल्स चॅम्पियन कॅमेरॉन नॉरीने कारकिर्दीतील सर्वोत्तम 14व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नोव्हाक जोकोविच सध्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर यूएस ओपन चॅम्पियन रशियाचा डॅनिल मेदवेदेव दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
 
एटीपी क्रमवारीत:
1. नोवाक जोकोविच (सर्बिया) 11430 गुण
2.डेनियल मेदवेदेव (रशिया) 9630 
3. स्टेफानोस सीतपितास  (ग्रीस) 7930
4 अलेक्झांडर ज्वेरेव (जर्मनी) 6680
5. राफेल नदाल (स्पेन) 5635
6. आंद्रे रुबलेव्ह (रशिया ) ) 5560
7. मॅटिओ बॅरेटिनी (इटली) 4688
8. कॅस्पर रुड (नॉर्वे) 3615 (+1)
9. डॉमिनिक थिएम (ऑस्ट्रिया) 3405 (-1)
10. ह्युबर्ट हेरकाझ (पोलंड) 3378
11. जेनिक सिनर 3260 (+2)
12. फेलिक्स ऑगर-अलियासिम (कॅनडा) 3196
13. डेनिस शापोवालोव्ह (कॅनडा) 2903 (+2)
14. कॅमेरॉन नोरी (ग्रेट ब्रिटन) 2895 (+2)
15 रॉजर फेडरर (2785- स्वित्झर्लंड)(-4 )
16. डिएगो श्वार्टझमन (अर्जेंटिना) 2693 (-2)
17. ख्रिश्चन गॅरिन (चिली) 2510
18. पाब्लो कॅरेनो (स्पेन) 2400
19. अस्लन करात्सेव्ह (रशिया) 2392 (+3)
20. रॉबर्टो बोतीस्ता (स्पेन) 2225
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

पुढील लेख
Show comments