Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियन कंपनीने मागितली सचिनची माफी

Webdunia
शनिवार, 16 मे 2020 (14:03 IST)
क्रिकेटचे साहित्य बनवणार्यास स्पार्टन कंपनीविरोधातील न्यायालयिन लढ्यात सचिन तेंडुलकरने बाजी मारली आहे. करार संपल्यानंतरही आपल्या नावाचा वापर करत कंपनीने बाजारात उत्पादने प्रमोट केल्याचा आरोप करत सचिनने ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात दावा ठोकला होता. यावेळी सचिनने कंपनीवर करारामधील नियमांचे पालन न करणे, ब्रँड एंडोर्समेंटसाठी ठरलेली रक्कम न देण्याचाही ठपका ठेवला होता. अखेरीस कंपनीने आपली चूक मान्य करत सचिनची माफी मागितलेली आहे. 
 
स्पार्टन कंपनीच्या प्रमोशनसाठी मुंबई आणि लंडनमध्ये काही कार्यक्रमही केले होते. मात्र कंपनीने करारातील सर्व नियमांचा भंग केल्याचा आरोप सचिनने केला होता. अखेरीस दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या समजुतीनंतर, आपली चूक मान्य करत कोर्टाच्या आदेशानुसार सचिनचे नाव किंवा त्याचा फोटो आपल्या उत्पादनांवर न वापरण्याचे मान्य केले आहे. 17 डिसेंबर 2018 नंतर स्पार्टन आणि सचिन यांच्यातला करार अधिकृतरित्या संपलेला आहे, यानंतरच्या कोणत्याही उत्पादनांसाठी कंपनी सचिनचं नाव वापरणार नाही, असे स्पार्टनचे संचालक लेस गलाब्रेथ यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान या प्रकरणात दोन्ही पक्षांनी फारसा वाद न वाढवता मैत्रीपूर्ण तोडगा काढल्याबद्दल सचिननेही समाधान व्यक्त केल्याची माहिती एसआरटी स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य  कार्यकारी अधिकारी मृणॉय मुखर्जी यांनी दिली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments