Festival Posters

बीसीसीआयच्या वर्चस्वाला धक्का

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:21 IST)
बीसीसीआयचा तीव्र विरोध असलेल्या आंतरराष्ट्रीय  क्रिकेट परिषदेमधील (आयसीसी)  प्रशासकीय आणि महसूल रचनेचे बदल बहुमताने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत श्रीमंत संघटना असलेल्या बीसीसीआयच्या वर्चस्वला जबर धक्का बसला आहे. आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन असलेल्या शशांक मनोहर यांच्या रणनीतीने बीसीसीआयची ‘विकेट’ घेतल्याचे मानले जात आहे. 
 
दुबई येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीत प्रशासकीय आणि घटनात्मक बदल 1 विरुद्ध 9 मतांनी मंजूर करण्यात आले. या बदलांविरुद्ध एकमेव मत बीसीसीआयतर्फे टाकण्यात आले. आयसीसी आणि बीसीसीआयदरम्यान वादाचा विषय ठरलेला महसूल वाटप रचनेतील बदल 8 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आला. भारताशिवाय श्रीलंकन क्रिकेट मंडळाने याविरुद्ध मतदान केले. 
 
बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीला देखील हा जबर धक्का मानला जात आहे. आयसीसीमधील बहुतेक सर्व सदस्य देश बीसीसीआयला पाठिंबा देतील, असा विश्‍वास समितीने व्यक्त केला होता.  
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

IPL 2026: चेन्नईने दिल्लीला २३ धावांनी हरवून पहिला विजय मिळवला

बुमराह आणि हेझलवुड, वैभवने कोणालाही सोडले नाही! विराटने एक खास भेट दिली तर टीम इंडियाच्या प्रवेशाबद्दल कुंबळेचा मोठा संकेत

PBKS vs SRH: हैदराबादने पंजाबविरुद्ध २१९ धावा केल्या

वैभव आणि जुरेल यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने बंगळूरवर ६ गडी राखून विजय मिळवला

वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच बॉलरने 9 विकेट्स घेतल्या

पुढील लेख
Show comments