Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BCCI ची वार्षिक बैठक आज, रॉजर बिन्नी होणार अध्यक्ष

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (11:19 IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक बैठक मंगळवारी (१८ ऑक्टोबर) मुंबईत होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष आणि आयसीसी अध्यक्षपदासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही केवळ औपचारिकता आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी अध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत. जागा बिनविरोध निवडल्या जाणार आहेत.
उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल अध्यक्षपदी अरुण धुमाळ यांची निवड करण्यात आली. बीसीसीआयने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी स्वत:चे नामांकन करावे की विद्यमान अध्यक्ष ग्रेक बार्कले यांना दुसर्‍या कार्यकाळासाठी पाठिंबा द्यायचा की नाही यावर चर्चा करण्यासाठी बोर्ड सदस्य वार्षिक बैठकीत भेटतील.

आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. मेलबर्न येथे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ICC बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. अलीकडेच आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाची चर्चा होती, मात्र अद्याप त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.
 
 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाळेमध्ये लहान मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टिचरला हाय कोर्टाने दिला निर्णय

अपघात : रस्त्यावरून खाली बस पालटल्याने चार जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

पुणे : पाईपमध्ये अडकली होती साडी, वाटर टँकर मध्ये आढळला महिलेचा मृतदेह

नागपुरात भरधाव ट्रक ने अल्पवयीन मुलाला चिरडले

महायुती नेत्यांमध्ये खटपट? अजित पवार वर शिवसेना नेत्याने साधला निशाणा, NCP ने केला पालटवर

सर्व पहा

नवीन

IND vs AFG : भारताची अफगाणिस्तानला हरवून सुपर एट टप्प्यात विजयी सुरुवात

T20 World Cup: केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय, कर्णधारपदाचा राजीनामा

USA vs SA: Super-8 आजपासून सुरू होईल, दक्षिण आफ्रिका विरुद्ध अमेरिका आज सामना , प्लेइंग 11 जाणून घ्या

श्रेयस अय्यर या मालिकेसाठी संघात परतणार?

स्मृती मंधाना ने आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली

पुढील लेख
Show comments