Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BCCI:ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला होऊ शकते शिक्षा,जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (10:34 IST)
श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे दोन भारतीय खेळाडू सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निशाण्यावर आहेत. दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे रणजी ट्रॉफीपासून अंतर ठेवले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामापूर्वी ईशान त्याच्या तंत्रावर काम करत असल्याची माहिती आहे. त्याचवेळी अय्यर यांना पाठीच्या किरकोळ दुखण्याने त्रास होत आहे. मात्र, बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी या दोघांवर पूर्णपणे खूश नसल्याचे दिसून येत आहे.
 
बीसीसीआय अय्यर आणि किशन यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे दोघांनाही नव्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अय्यर आणि किशन या दोघांना 2023-24 हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून काढून टाकले जाईल. या निर्णयामागील एक कारण म्हणजे बोर्डाच्या आग्रहानंतरही त्याची देशांतर्गत क्रिकेटमधून अनुपस्थिती.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता, पण दौऱ्याच्या सुरुवातीला ब्रेक घेऊन परतला होता. तेव्हापासून तो लाइमलाइटपासून गायब आहे. किशन बडोद्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सराव करताना दिसला

श्रेयस अय्यरला त्याच्या खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमधून संघातून वगळण्यात आले होते. त्याला रणजी खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र पाठदुखीमुळे श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात एनसीएने श्रेयसला फिट घोषित केले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत नसून तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे
 
Edited By- Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

Duleep Trophy: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत क संघाने डी संघाचा चार गडी राखून पराभव केला

राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, राजस्थान रॉयल्सने त्याला दिली मोठी जबाबदारी

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने सोडली रेल्वेची नौकरी राजीनामा दिला

या तारखेपासून WTC 2025 फायनल लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठा खुलासा केला

पुढील लेख
Show comments