हवाई फटके मारणे म्हणजे गुन्हा नाही. हवेत फ टकेबाजी केल्याने त्याचा सकारात्क परिणाम होणार असेल, तर त्यात गैर काहीच नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.
मुंबईतील त्याच्या क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षणार्थी मुलांशी संवाद साधताना त्याने हे मत व्यक्त केले. फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी करण्यात कोणतेही नुकसान नाही. आपल्याला चांगले परिणाम मिळत असतील, तर असे करणे चुकीचे नाही, असे रोहित म्हणाला.