Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cricket World Cup 2023 : वेस्ट इंडिजचं वर्ल्डकपआधीच 'पॅकअप'

Webdunia
शनिवार, 1 जुलै 2023 (22:45 IST)
एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिज संघावर यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रच न ठरण्याची नामुष्की ओढवली आहे.
 
झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि आज स्कॉटलंड अशा तीन संघांविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागल्याने वेस्ट इंडिज भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
50 षटकांच्या विश्वचषकासाठी पात्रही न ठरण्याची वेस्ट इंडिजची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकासाठी पात्र होता आलं नव्हतं.
 
विश्वचषकात 10 संघ सहभागी होणार आहेत. क्रमवारीनुसार 8 संघ पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांना पात्र होता आलं नाही.
 
झिम्बाब्वेत सुरू असलेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत चांगली कामगिरी करत पात्र ठरण्याची संधी दोन्ही संघांना होती. श्रीलंकेने त्यादृष्टीने दमदार वाटचाल केली आहे पण वेस्ट इंडिजचा संघ मात्र गाळातच रुतला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघातील बहुतांश खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात. भारतीय वातावरणात खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना विश्वचषकात उपयोगी ठरला असता, पण वेस्ट इंडिजसाठी खेळताना सुमार कामगिरी झाल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे.
 
क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिज संघाने 1975 साली पहिलावहिला विश्वचषक पटकावला. चार वर्षानंतर 1979 मध्ये चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत वेस्ट इंडिजने जेतेपदावर नाव कोरलं.
 
जेतेपदांची हॅट्टिक करण्याची संधी वेस्ट इंडिजकडे होती. पण 1983 स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला धक्का देत जेतेपदावर कब्जा केला.
 
दोन जेतेपदांनंतर वेस्ट इंडिजला एकदाही 50 षटकांच्या विश्वचषकाचं जेतेपद पटकावता आलेलं नाही. झिम्बाब्वेत सुरू असलेल्या पात्रता फेरी स्पर्धेत वेस्ट इंडिजने अमेरिकेला नमवत चांगली सुरुवात केली. नेपाळला हरवत त्यांनी विश्वचषकासाठी तय्यार असल्याचं दाखवून दिलं. पण यजमान झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजला नमवत दणका उडवला. झिम्बाब्वेने दिलेलं 269 धावांचं आव्हान पेलताना वेस्ट इंडिजचा डाव 233 धावांतच आटोपला.
 
नेदरलँड्सविरुद्ध जे घडलं ते क्रिकेट चाहत्यांसाठीही अनपेक्षित असं होतं. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 374 धावांचा डोंगर उभारला. निकोलस पूरनने शतकी खेळी साकारली.
 
नेदरलँड्सने तेजा निदामानरुच्या शतकाच्या बळावर 374 धावा करत सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. व्हॅन बिकच्या फटकेबाजीच्या बळावर नेदरलँड्सने एका षटकात 30 धावा कुटल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना जॉन्सन चार्ल्स आणि रोमारिओ शेफर्ड बाद झाल्याने वेस्ट इंडिजचा डावच आटोपला आणि नेदरलँड्सने थरारक विजय मिळवला.
 
वेस्ट इंडिजसाठी हा खऱ्या अर्थाने मोठा धक्का होता. अमेरिका आणि नेपाळविरुद्धच्या विजयामुळे त्यांनी सुपर सिक्स फेरी गाठली. पण शनिवारी स्कॉटलंडने त्यांना अवघ्या 181 धावांत गुंडाळलं. त्यानंतर 7 विकेट्सच्या मोबदल्यात स्कॉटलंडने हे लक्ष्य गाठलं. स्कॉटलंडचा वनडेतला वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिलाच विजय आहे.
 
शे होपच्या नेतृत्वात आणि डॅरेन सॅमीच्या प्रशिक्षणात खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पात्रता फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताच आली नाही. ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका त्यांना बसला. दुखापती तसंच स्वैर गोलंदाजी यामुळे वेस्ट इंडिजला मोठ्या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. जोरकस फटके मारण्यासाठी प्रसिद्ध खेळाडूंना संयमी खेळी करण्यात अपयश आलं.
 
पात्रता फेरी स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या श्रीलंका आणि ओमानविरुद्धच्या लढती बाकी आहेत. पण विश्वचषकात खेळण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यातले गुण कॅरी फॉरवर्ड होण्याच्या नियमामुळे वेस्ट इंडिज संग पिछाडीवर गेला.
 
वेस्ट इंडिजची विश्वचषकनिहाय कामगिरी
1975 विजेते
1979 विजेते
1983 उपविजेते
1987 प्राथमिक फेरी
1992 प्राथमिक फेरी
1996 उपांत्य फेरी
1999 प्राथमिक फेरी
2003 प्राथमिक फेरी
2007 सुपर एट
2011 क्वार्टर फायनल
2015 क्वार्टर फायनल
2019 प्राथमिक फेरी
2023- पात्र ठरु शकले नाहीत
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments