Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

15 ओव्हर आणि 38 धावांत आयर्लंडचा सुपडा साफ

Webdunia
सव्वा दोन दिवस, चार इनिंग्ज आणि 40 विकेट्स या कल्लोळात इंग्लंडने सख्खे शेजारी आयर्लंडला एकमेव कसोटीत 143 धावांनी चीतपट केलं. चौथ्या डावात 182 धावांचं लक्ष्य मिळालेल्या आयर्लंडचा डाव अवघ्या 38 धावांतच आटोपला.
 
पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत आटोपलेल्या इंग्लंडने आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत खळबळजनक विजयाची नोंद केली. आयर्लंडला विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य मिळालं होतं मात्र इंग्लंडच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 15.4 ओव्हर्समध्ये 38 धावांवरच गडगडला आणि इंग्लंडने 143 धावांनी विजय मिळवला.
 
ख्रिस वोक्सने 17 धावांत 6 विकेट्स घेत आयर्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. स्टुअर्ट ब्रॉडने 19 धावांत 4 विकेट्स घेत वोक्सला चांगली साथ दिली. दहा दिवसांपूर्वी इंग्लंडने लॉर्डस इथेच न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं.
 
आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत इंग्लंडची दाणादाण उडाली आणि त्यांचा पहिला डाव 85 धावांतच आटोपला. टिम मुर्तगाने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. आयर्लंडलने 207 धावांची मजल मारत मोठी आघाडी मिळवली. अलेक्स बलर्बिनीने सर्वाधिक 55 धावा केल्या.
 
इंग्लंडने दुसऱ्या डावात चिवटपणे खेळ करत 303 धावांची मजल मारली. नाईट वॉचमन जॅक लिचने 92 तर जेसन रॉयने 72 धावांची खेळी केली. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र गवत असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत आयर्लंडचा धुव्वा उडवला. एक तारखेपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करून विक्रम केला

IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत विराट कोहली अपयशी ठरला

युझवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोट होणार? इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले

भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती,घेतला मोठा निर्णय

IND vs AUS: रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर, हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये परतणार

पुढील लेख
Show comments