Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ind Vs Bangladesh: कोहली आणखी एका विक्रमाच्या शिखरावर; बांगलादेशसमोर 185चं आव्हान

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (16:00 IST)
के.एल.राहुल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय संघाने वर्ल्डकपमधल्या बांगलादेश विरुद्धच्या लढतीत पावणेदोनशेचा टप्पा ओलांडला. विराट कोहली आणि के.एल.राहुल यांची अर्धशतकं भारतीय इनिंग्जचं वैशिष्ट्य ठरलं.
 
गांधीजयंतीदिनी लोकेश राहुलने गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली होती. दुखापतीतून सावरलेल्या राहुलचं ते पुनरागमन होतं.
 
ऑस्ट्रेलियात गेल्यापासून राहुलची बॅट तळपली नाही. पाकिस्तान, नेदरलँड्स तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी करता न आल्याने राहुलला संघातून वगळावं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
 
राहुलऐवजी ऋषभ पंतला समाविष्ट करावं अशी मागणीही होऊ लागली. पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी कोच राहुल द्रविड यांनी राहुलला ठाम पाठिंबा दिला. राहुल अंतिम अकरात असेल यावर राहुल यांनी शिक्कामोर्तब केलं.
 
संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत राहुलने बांगलादेशविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारली. बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात आणि आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा झटपट आऊट झाला पण राहुलने खेळपट्टीचा अंदाज घेत आगेकूच केली.
राहुल-विराट जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 67 रन्सची भागीदारी केली. मोठे फटके आणि एकेरीदुहेरी धावांची सुरेख सांगड घालणाऱ्या राहुलने खेळपट्टीचा अंदाज आल्यावर मोठे फटके खेळायला सुरुवात केली.
स्पर्धेत झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमारने या मॅचमध्येही बॅटचा दणका दाखवला. त्याने 16 बॉलमध्ये 4 फोरसह 30 धावांची वेगवान खेळी केली.
खेळपट्टीवर स्थिरावलेला सूर्यकुमार धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच शकीबने त्याला आऊट केलं. हसन महमूदच्या बॉलिंगवर बॉलला टपली मारण्याचा हार्दिक पंड्याचा प्रयत्न यासिर अलीच्या हातात जाऊन विसावला. त्याला 5 रन्स करता आल्या.
 
विराटने 37 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. दिनेश कार्तिक चोरटी रन घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला तर हसन महमूदच्या फसव्या बॉलवर अक्षर पटेल फसला. रवीचंद्रन अश्विनने 6 बॉलमध्ये 13 रन्स करत कोहलीला चांगली साथ दिली.
 
कोहली खेळीदरम्यान आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्कप स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरला. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर होता.
 
कोहलीने संपूर्ण 20 ओव्हर्स खेळत 44 बॉलमध्ये नाबाद 64 रन्सची खेळी केली. दुसऱ्या बाजूने सातत्याने सहकारी आऊट होत असतानाही कोहलीने नेहमीच्या हातोटीने खेळ करत बांगलादेशच्या बॉलर्सना निरुत्तर केलं.
 
23 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीच्या अफलातून खेळीच्या बळावर भारताने संस्मरणीय विजय साकारला. यानंतर भारतीय संघाने नेदरलँड्सचे आव्हान परतावून लावले.
 
पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर आफ्रिकेच्या भेदक बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समननी शरणागती पत्करली. डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रम यांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
 
सेमी फायनलमध्ये वाटचाल करण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही लढत महत्त्वपूर्ण आहे.
 
Published By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

भारतीय संघाच्या माजी खेळाडूच्या नावावर अटक वॉरंट जारी

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments