Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND W vs BAN W: बांगलादेशात हरमनप्रीत कौरला राग आला, स्टंपला मारले

Webdunia
रविवार, 23 जुलै 2023 (11:22 IST)
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला. ढाका येथे शनिवारी (22 जुलै) झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या महिला संघाने 50 षटकांत 4 गडी गमावून 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 49.3 षटकांत 225 धावांत आटोपला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.

या सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर खूप चिडली होती. तिहार  राग इतका वाढला की तिने बॅटने स्टंपला आपटले. एवढेच नाही तर तिने बराच वेळ पंचांशी वाद घातला. यानंतर, मॅचनंतरच्या सादरीकरणात, ती म्हणाली की पुढच्या वेळी बांगलादेश दौऱ्यावर, तिला खराब अंपायरिंगसाठी तयार व्हावे लागेल.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 139 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यास्तिका भाटिया पाच आणि शेफाली वर्माने चार धावा करून बाद झाल्या. स्मृती मंधानाने 59 धावा केल्या. मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हरलीन देओलला साथ देण्यासाठी क्रीझवर आली, पण तिला जास्त वेळ फलंदाजी करता आली नाही. हरमनप्रीत 14 धावा करून नाहिदा अख्तरवर एलबीडब्ल्यू आऊट झाली
 
34 व्या षटकात हरमनप्रीतने नाहिदाच्या चौथ्या चेंडूवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ती शॉट चुकली. गोलंदाज आणि सहकारी खेळाडूंनी आऊटसाठी अपील केल्यावर पंचांनी हरमनप्रीतविरुद्ध निर्णय दिला. आऊट दिल्यानंतर तिला राग आला. त्याने रागाने स्टंपवर बॅट मारली आणि पॅव्हेलियनकडे जाताना तिने अंपायरला सूचित केले की चेंडू बॅटला आधी लागला होता. याशिवाय हरमनप्रीतने प्रेक्षकांना अंगठाही दाखवला
 
हरमनप्रीतने सामना बरोबरीत सोडवल्यानंतर ती म्हणाली, “मला वाटते की या सामन्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. अंपायरिंगच्या प्रकाराने आम्हाला खूप आश्चर्य वाटले. पुढच्या वेळी आम्ही बांगलादेशात आलो, तेव्हा आम्ही खात्री करून घेऊ की आम्ही या प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जाऊ आणि त्यानुसार स्वतःला तयार करू. 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला,हजार धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय कर्णधार ठरली

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाकिस्तान मेगा मॅच होणार

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

पुढील लेख
Show comments