Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND W vs SL W:सलग दुसऱ्या विजयासह, भारत उपांत्य फेरीसाठी सज्ज

IND W vs SL W:सलग दुसऱ्या विजयासह, भारत उपांत्य फेरीसाठी सज्ज
, बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (10:56 IST)
महिला टी-20 विश्वचषकाचा उत्साह कायम आहे. भारतीय संघ बुधवारी श्रीलंकेशी भिडणार आहे. या सामन्यात भारताचा सलग दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी त्यांनी पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला होता. 

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 25 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 19 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेला केवळ पाच वेळा विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.श्रीलंकेविरुद्धच्या आकडेवारीत भारताचा वरचष्मा आहे,
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला T20 विश्वचषक 2024 चा हा सामना बुधवारी  म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. 

महिला T20 विश्वचषक 2024 भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक  होईल. 
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे...
भारत:  स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजीवन संजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका सिंह ठाकूर.
श्रीलंका:  विश्मी गुणरत्ने, चमरी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधिनी, इनोका रणवेरा.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Israel : इस्रायलचा सीरियातील दमास्कस मध्ये मोठा हल्ला; अनेकांचा मृत्यू