rashifal-2026

सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक पाहिजे

Webdunia
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (15:48 IST)

अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. मात्र यावरच द्रविड नाराज आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल द्रविडने नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे, अशी द्रविडची भूमिका आहे. 

सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा, फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार, ट्रेनर अनंत दाते, मंगेश गायकवाड आणि व्हिडिओ अॅनेलिस्ट देवराज राऊत यांचा समावेश आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

MI vs RCB : आरसीबीने मुंबईवर तीन विकेट्सने विजय मिळवला

पाचवी कसोटी 5 विकेट्सने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 4-1 असा अ‍ॅशेस जिंकला

WPL च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना RCB शी होणार

बांगलादेश टी२० विश्वचषकासाठी भारतात न येण्यावर ठाम, आयसीसीला दुसरे पत्र लिहिले

IND vs NZ: भारतीय संघाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन T20 सामन्यांमधून तिलक बाहेर; BCCI ची घोषणा

पुढील लेख
Show comments