Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेम्पो चालवून गुजराण करत आहेत बुमराहचे आजोबा

Webdunia
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहचे आजोबा संतोष सिंह बुमराह सध्या हलाखीच्या परिस्थितीत राहत असून उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील किच्छा आवास विकास कॉलनीमध्ये 84 वर्षीय संतोष सिंह भाड्याने राहत असून ते अजूनही टेम्पो चालवून आपला चरितार्थ चालवत आहेत. दरम्यान अहमदाबादमध्ये राहणारे सिंह हे या पूर्वी फेब्रिकेशनच्या तीन कारखान्यांचे मालक होते. आपला मुलगा आणि जसप्रित बुमराहचे वडील जसवीर बुमराहसोबत ते तीनही कारखान्याचे काम पाहत असत.
 
2001 मध्ये जसप्रित बुमराहचे वडील जसवीर सिंह यांचे कावींळामुळे निधन झाले. त्यानंतर संतोष यांची हिंमत तुटली. या घटनेनंतर त्यांचे कारखाने आर्थिक संकटात आल्याने त्यांना कर्ज देण्यास बँकेने मनाई केल्यामुळे त्यांना आपल्या तीनही फॅक्टरी बंद कराव्या लागल्या. जसप्रितचे आजोबा 2006 मध्ये उधमसिंह नगरातील किच्छा येथे आले. तिथे त्यांनी चार टेम्पो विकत घेतले आणि किच्छा परिसरात ते टेम्पो चालवू लागले. काही दिवस काम सुरळीत सुरू झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती पुन्हा एकदा ढासळली. यात त्यांना चारपैकी तीन टेम्पो विकावे लागले.
 
जसप्रितचे काका अपंग आहेत आणि जसप्रितच्या आजीचे 2010 मध्ये निधन झाले आहे. बराच काळ अहमदाबादमध्ये राहणार्‍या जसप्रितच्या आत्यानेच वडील आणि भावांचा खर्च केला. संतोष सिंह यांनी वयाच्या शेवटच्या टप्प्यात ज‍सप्रितला आशीर्वाद दिले आहेत. जसप्रितच्या आजोबांची आर्थिक परिस्थिती पाहून किच्छाच्या एसडीएमने त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून पूर्ण चौकशी केली. त्यांना साहय्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments