rashifal-2026

जो रूटने आणखी एक अद्भुत विश्वविक्रम रचला

Webdunia
मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 (14:00 IST)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णित राहिली. याचा अर्थ कोणताही संघ जिंकला नाही किंवा हरला नाही. पाच सामन्यांपैकी टीम इंडियाने दोन सामने जिंकले, तर इंग्लंडने दोन सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. तथापि, मालिकेत अनेक विक्रम बनले, लोक ते मोजून मोजून थकले. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने असा विक्रम केला .

ALSO READ: ओव्हलवर टीम इंडियाचा रोमांचक विजय, कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका जो रूटसाठी खूप चांगली होती, त्याने शानदार फलंदाजी केली आणि त्याच्या संघाला विजय मिळवून दिला. जो रूटने या मालिकेत एकूण पाच सामन्यांमध्ये 537 धावा केल्या आहेत. त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. या मालिकेत जो रूटची सरासरी 67.12 होती. जो रूटने या मालिकेत 150 धावांची खेळीही खेळली. शुभमन गिलनंतर तो या मालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तथापि, जो रूटने इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत

 ALSO READ: शुभमन गिल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करून ब्रॅडमन-गूचच्या क्लबमध्ये सामील

जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये एकाच गोलंदाजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. जो रूटने आतापर्यंत रवींद्र जडेजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी, एकाच गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्टीव्ह स्मिथच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 577 धावा केल्या आहेत.

Edited By - Priya Dixit

ALSO READ: दुलीप ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर,सर्व सामने या मैदानावर होणार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारत-पाक मॅचच्या तिकिट विक्रीवर गोंधळ

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

BMC Elections निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा यांनी मतदान केले

४ पाकिस्तानी-अमेरिकन खेळाडूंना व्हिसा मंजुरीस विलंब, भारतात होणारा टी-२० विश्वचषक

कर्नाटकचा मुंबईला 55 धावांनी पराभूत करत सलग चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

पुढील लेख
Show comments