rashifal-2026

RIP वासूदेव परांजपे यांचे निधन

Webdunia
सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:57 IST)
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे यांचे 82व्या वर्षी निधन झाले आहे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. सुनील गावसकरांना सनी हे टोपननाव त्यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.
 
मुंबई आणि बडोद्याकडून 29 फर्स्ट क्लास क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या परांजपे यांनी नंतरचे त्यांचे सर्व आयुष्य क्रिकेट प्रशिक्षणासाठी ठेवले. मोठा क्रिकेटपटू ओळखण्याची नजर त्यांच्याकडे होती. त्यांनी राहुल द्रविडला वयाच्या 14 व्या वर्षीच तू भारताकडून खेळशील, पण त्यासाठी विकेटकिंपगपेक्षा बॅटींगवर अधिक फोकस कर, असा सल्ला दिला होता.
 
परांजपे यांचा हा सल्ला द्रविडनं मानला. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास आहे. त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेटचा द्रोणाचार्य हरपला अशी भावना या निमित्तानं व्यक्त होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

ZIM vs SA :दक्षिण आफ्रिकेकडून झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव करत सुपर एट मध्ये प्रवेश

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

सेमीफायनलमध्ये लंकेवर ५ धावांनी विजय मिळवूनही पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २-० अशी जिंकली

क्रिकेटपटू रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला, वडिलांचे निधन

पुढील लेख
Show comments