Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शर्विन उदय किसवे यांची १९ वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (14:59 IST)
नाशिकच्या शर्विन उदय किसवे यांची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. ९ मे ते २ जून दरम्यान माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरूतर्फे भारतभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी हे शिबिर होणार आहे. डावखुरा सलामीवीर शर्विन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिकादेखील निभावतो.

१४ वर्षे वयोगटापासूनच शर्विनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शर्विन सध्या कच बिहार करंडक स्पर्धेत कोलकता येथे बाद फेरीतील सामने खेळत आहे.त्याच्या या निवडीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शर्वीन हा प्रशासकीय अधिकारी उदय किसवे यांचा मुलगा असून त्याच्या या निवडीचे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. किसवे कुटुंब मुळ मनमाडचे असल्यामुळे मनमाडकरांनी या निवडीनंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. त्याच्या या वाटचालीस इंडिया दर्पण परिवारातर्फे शुभेच्छा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: 8 हजार पेक्षा धावा करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज बनला

IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केलं बाहेर

भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचे लॉरेस वर्ल्ड कमबॅक पुरस्कारासाठी नामांकन, मिळू शकतो मोठा सन्मान

आयपीएल 2025पूर्वी केकेआरने जारी केली संघाची जर्सी

UPW vs GG: गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 81 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments