Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

...म्हणून धवन यशाच्या शिखरावर

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (12:23 IST)
भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवन सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कालखंडातून जात आहे. परंतु एकामागून एक यश मिळत असतानाही तो आपला पडता काळ विसरलेला नाही. फॉर्म हरवल्यामुळे धवनला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले होते. परंतु त्याच अपयशातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले आणि त्यामुळेच यशाची किंमतही समजून आली, असे सांगताना धवनने आपल्या प्रगल्भतेची चुणूक दाखविली.
 
गेल्या वर्षी धवनचा सूर इतका हरपला होता की, त्याला एकाही डावात यश मिळत नव्हते. काही वेळा आपल्याच चुकीचा फटका त्याला बसला, तर काही वेळा गोलंदाजांच्या कौशल्याचा तो बळी ठरला. काही वेळा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचाही तो बळी ठरला. परंतु परिणाम एकच होता… न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. हा धक्‍का आणि धडाही शिखर धवनसाठी पुरेसा होता आणि गेल्या काही दिवसांत त्याने हे सिद्ध करून दाखविले आहे.
 
लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी धवनची निवड झाली आणि त्याने ही संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडली. स्पर्धेत सर्वाधिक धावा करताना त्याने सर्वोत्तम फलंदाजाचे पारितोषिक पटकावलेच, शिवाय वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघात निवडीचे बक्षीसही त्याला मिळाले. तिथेही त्याने अप्रतिम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची कामगिरी नेत्रदीपक होती. काल पहिल्या एकदिवसीय सामन्यातील धवनचे शतक त्याच्या आत्मविश्‍वासाचे प्रतीक होते.
 
अपयशी ठरत असताना आपण आपल्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल आणि शैलीबद्दलच विचार करीत होतो. तसेच यशस्वी होत असतानवाही मी वेगळे काही करीत नाही. त्यामुळे यशापयशाचा माझ्यावर तसा फार परिणाम होत नाही, असे सांगून धवन म्हणाला की, सध्यासारखाच फॉम मला 2013 चॅम्पियन्स करंडकातही गवसला होता. त्यानंतरच मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक फटकावले होते. तोच सूर पुन्हा गवसल्याची जाणीव मला होते आहे.
 
सध्या संघात असलेल्या आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या तरुण खेळाडूंशी यशस्वी स्पर्धा करण्याकरिता आपली तंदुरुस्ती सर्वोच्च स्तरावर कायम राखण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो, असे सांगून धवन म्हणाला की, क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याची मला जाणीव आहे. मग ते कसोटी क्रिकेटमधील असो, की झटपट क्रिकेटमधील. एक झेल सुटला तरी तुम्ही सामना गमावू शकता. त्यामुळे त्याबाबतीत तडजोड करता येणार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

IPL Auction: IPL 2025 चा मेगा लिलाव संपला, पंत राहिला सर्वात महागडा खेळाडू, वैभव बनला करोडपती

पुढील लेख
Show comments