Dharma Sangrah

भारताचे सराव सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:24 IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला लागलेले पावसाचे ग्रहण सुटण्याची चिन्हे नाहीत. चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीनुसार सामन्याचा निकाल लावावा लागला होता. आता कोलकाता येथेही पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे भारतीय संघाचे पहिले सराव सत्र रद्द करावे लागले.
 
त्याच वेळी पहिल्या सामन्यात पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सरावाचा आग्रह धरल्यामुळे त्यांच्यासाठी इनडोअर सरावाची व्यवस्था करण्यात आली. ईडन गार्डन स्टेडियमची आजची अवस्था पाहून ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने सकाळीच “आज मैदानावर जाता येईल असे वाटत नाही’ अशा अर्थाचे ट्‌विट केले होते आणि घडलेही तसेच.
 
मैदानाची अवस्था पाहून भारतीय संघ लगेचच हॉटेलमध्ये परतला. किमान दोन-तीन तास कडक उन्ह पडल्याशिवाय सराव शक्‍य नसल्याचे भारतीय संघाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. तसेच सामन्याला आणखी दोन दिवस असल्यामुळे आपल्याला पाऊस कमी होण्याची आणि मैदान तयार करता येण्याची आशा असल्याचे पूर्व विभागाचे क्‍यूरेटर आशिष भौमिक यांनी सांगितले.
 
गेल्या दोन दिवसांपासून कोलकात्यात पाऊस आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे हा पाऊस होत असल्याचे कोलकाता वेधशाळेचे संचालक गणेश दास यांनी सांगितले. तसेच कमी दाबाचा पट्टा उद्यापर्यंत कमी होणार असला, तरी गुरुवारी, सामन्याच्या दिवशी पाऊस होण्याची शक्‍यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

ढाका संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीसीसीआयने अंडर-19विश्वचषक संघ जाहीर केला, आयुष कर्णधारपदी

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

भारताने तिसरा T20I आठ विकेट्सने जिंकला

वैभव सूर्यवंशी यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला

पुढील लेख
Show comments