Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vinod Kambli Controversy: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरोधात एफआयआर दाखल

Webdunia
रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (11:16 IST)
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले  आहे. यावेळी पत्नी अँड्रिया त्यांच्या  विरोधात उभी राहिली आहे. अँड्रियाच्या तक्रारीवरून मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात कांबळीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कांबळी यांनी पत्नी अँड्रिया यांना  शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर दारूच्या नशेत त्यांनी पत्नीलाही मारहाण केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
 
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळी विरुद्ध  एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कांबळीवर मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण  केल्याचा आरोप असून मद्यधुंद अवस्थेत मुलांना शिवीगाळ केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आले .त्यांनी केवळ पत्नीलाच मारहाण केली नाही, तर मुलालाही शिवीगाळ केली. 12 वर्षाच्या मुलाने कांबळी यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मुलाला शिवीगाळ करून नंतर पत्नीला मारहाण केली. मात्र, हे प्रकरण मिटवले जात असल्याचे त्यांची पत्नी अँड्रियाने म्हटले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर अँड्रिया आधी भाभा हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यानंतर तिने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि एफआयआर नोंदविला.
 
माजी क्रिकेटपटू  विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी  एकूण 3,561 धावा केल्या. यामध्ये एकूण सहा शतकांचा समावेश आहे. त्यांनी  कसोटीत चार शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली. 1991 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कांबळीने अवघ्या नऊ वर्षात आपली कारकीर्द संपवली. त्यांनी  शेवटचा सामना 2000 मध्ये खेळला, 
Edited By - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

स्मृती मंधानाने या मालिकेत एकूण सहा विक्रम केले

भारतीय संघाच्या माजी खेळाडूच्या नावावर अटक वॉरंट जारी

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments