Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलेला पाहून गेलने सोडला कमरेचा टॉवेल

Webdunia
गुरूवार, 7 जानेवारी 2016 (11:40 IST)
नवी दिल्ली- तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळख असलेला वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल सध्या गैरवर्तणुकीमुळे चर्चेचे केंद्रस्थान झाला आहे. एका वाहिनीच्या निवेदिकेशी असभ्य वर्तन केल्याची घटना ताजी असतानाच त्याने संघाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन महिला सहकाऱ्यासोबतही गैरवर्तन केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ड्रेसिंग रूममध्ये गेले असता गेलने कमरेभोवती गुंडाळलेले टॉवेल सोडून गैरवर्तन केल्याची आपबिती ऑस्ट्रेलियन महिलेने तेथील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कथन केली. 
 
संबंधित महिला ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी वेस्ट इंडीजच्या संघाचे व्यवस्थापन पाहत होती. ती म्हणाली की, दिवसभरात मी काहीही न खाल्ल्याने खूप भूक लागली होती. त्यामुळे मी वेस्ट इंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये गेली. प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याने सर्व खेळाडू मैदानात असतील असा माझा समज झाला. पण त्याचवेळी ख्रिस गेल आणि त्याचा आणखी एक सहकारी ड्रेसिंग रूममध्येच होते. मी खाण्यासाठी काहीतरी शोधत असताना गेलने कमरेभोवती गुंडाळलेले टॉवेल सोडले आणि तुला हेच हवं आहे का? असे निर्लज्जपणे त्याने विचारले. झालेल्या घटनेची मी वेस्ट इंडीज संघाचे व्यवस्थापक रिची रिचर्डसन यांनी दिली होती. त्यानंतर आपल्या सर्व खेळाडू आणि सहकाऱ्यांना ई-मेल करून त्यात आपल्या महिला संघ सहकाऱ्यासोबत आदराने वागले पाहिजे, असे रिचर्डसन यांनी बजावले होते. 
 
दरम्यान, गेलने एका चॅनलच्या निवेदिकेशी फ्लर्ट करण्यामुळे त्याला मोठा दंड भरावा लागल्याची घटना अजून ताजी आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments