तिरूवनंतपुरम. शांतकुमारन श्रीसंथच्या वडिलांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणात धोनी व हरभजन सिंह यांनी श्रीसंथला फसवल्याचा काल आरोप केल्यानंतर आज घुमजाव करत माफी मागितली आहे.
गुरूवारी त्यांनी याप्रकरणात श्रीसंथ निर्दोष असून धोनी व हरभजन सिंह यांनी षडयंत्र रचून त्याला फसवल्याचा सनसनाटी आरोप केला होता. मात्र आज पोलिसांनी सत्य बाहेर आणल्यानंतर त्यांचे बहुदा मतपरिवर्तन झाले असावे. (वार्ता)