Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानच्या 5 शूर महिला, ज्यांनी विचारांची दिशा बदलली

अफगाणिस्तानच्या 5 शूर महिला  ज्यांनी विचारांची दिशा बदलली
Webdunia
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (14:14 IST)
अफगाणिस्तान… तालिबान, आजकाल ही नावे दहशत निर्माण करत आहेत, भीती आणि शंकेमुळे हृदय धडधडत आहेत… सोशल मीडियावरील येत असलेले व्हिडिओ इशारा देतात की हे आपल्याला विचलित करु शकतं… आम्ही पुढे वाढून जातो पण कुठेतरी काही चेहरा अटकून बसतात, कुठेतरी काही वेदना जाणवतात, कुठेतरी काहीतरी किंचाळणे, रडणे, ओरडणे कानात बराच वेळ वितळत राहतं ....
 
जेव्हा जेव्हा कुठेही परिस्थिती बदलते तेव्हा महिला आणि मुलं सर्वात हैराण होतात ... पण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की विषम काळातही स्त्री शक्ती मजबूत आणि दमक दाखवून उदयास आली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीतून उदयास आले ते नावे ज्यांनी त्यांच्या धैर्याने आणि बौद्धिक पराक्रमाने चित्र बदलले .... चला एक नजर टाकूया.
 
* तुर्कलारची गवार्शद बेगम- 1370-1507 च्या तिरुरिद राजवटीच्या दरम्या नगवार्शद बेगम या 15 व्या शतकातील एक प्रसिद्ध व्यक्ती झाल्या. त्यांचा विवाह शासक शाहरुख तैमुरीदशी सोबत झाला होता. त्या राणी होत्या पण त्यांनी पहिल्यांदा अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. त्या मंत्रीही झाल्या आणि अफगाणिस्तानात कला आणि संस्कृतीला पुढे नेण्यात भूमिका बजावली.
 
त्या कलाकार आणि कवींना प्रोत्साहन देत असे. त्यांच्या काळात अनेक महिला साहित्यिक आणि कवींना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. तेव्हा तिमूरिद राजवंशाची राजधानी हेरात होती, जे त्यांच्या नेतृत्वाखाली कलेचे प्रमुख केंद्र बनले. आर्किटेक्चर आणि कला त्यांच्या प्रयत्नांमुळे बहरल्या. जे अजूनही अफगाणिस्तानच्या काही भागात जिवंत आहेत. त्यांनी धार्मिक शाळा, मशिदी आणि आध्यात्मिक केंद्रे बांधली. गवर्शद बेगम एक चतुर राजकारणी होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या आवडत्या नातवाला सिंहासनावर बसवून 10 वर्षे राज्य केले.
 
* राबिया बालखाई- राबिया यांचा जन्म 9 व्या शतकात अफगाणिस्तानच्या बालाख येथे राजघराण्यात झाला. देशातील आधुनिक फारसी भाषेत कविता लिहिणाऱ्या त्या पहिल्या कवयित्री होत्या. त्यांनी इतकी प्रसिद्धी मिळवली की इतर कवी त्याचा हेवा करू लागले. असे म्हटले जाते की या हेवेमुळे, एका सुप्रसिद्ध पुरुष कवीने त्यांना मारले.
 
तथापि, असेही काही तथ्य आहे की राबिया यांची हत्या त्यांच्या भावामुळे राजघराण्याच्या गुलामाच्या प्रेमात पडल्यामुळे झाली. त्या दासाच्या शौर्याने प्रभावित झाल्या. राबिया यांनी प्रेमाबद्दल लिहिलेल्या काव्याने त्यांना अफगाणिस्तानच्या इतिहासात अजरामर केले. त्यांना समानता आणि न्यायाच्या लढ्याचे प्रतीक मानले गेले.
 
* रानी सोराया तारजी- राणी सोराया अफगाणिस्तानच्या सर्वात प्रभावशाली राजघराण्याच्या सदस्या होत्या. त्या अफगाणिस्तानचा राजा अमानुल्ला खान यांच्या पत्नी होत्या. ज्याने 1919 ते 1921 पर्यंत इंग्रजांशी लढून त्यांना मुक्त केले होते. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये स्वतंत्र आणि पुरोगामी मनाचा शासक होते. सोरया केवळ उच्चशिक्षितच नव्हत्या तर त्या महिला हक्क आणि मुलींच्या शिक्षणाच्या वकिली होत्या. त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडल्या. इर्शाद-ए-निशवान ही पहिली महिला मासिक सुरू केली. त्यांचे विचार आजही देशातील महिलांना प्रेरणा देतात.
 
* नादिया अंजुमा- नादिया अंजुमा यांचा जन्म 1980 मध्ये हेरात येथे झाला. नादिया इतर स्त्रियांसह भूमिगत शाळा आणि साहित्यिक उपक्रमांना जाऊ लागली. हेरात विद्यापीठाचे प्राध्यापक मुहम्मद अली राहयाब यांनी त्यांना साहित्य शिकवले. हा तो काळ होता जेव्हा तालिबानने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली होती. तालिबानी राजवट संपल्यावर नादियाने हेरात विद्यापीठात त्यांचा अभ्यास सुरू केला. 
 
लवकरच त्या एक सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून ओळखल्या गेल्या. गुल ए दाऊदी या त्यांच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित झाले. नादिया या अजूनच प्रसिद्ध झाल्या जेव्हा त्यांच्या चाहत्यांना हे कळले की त्यांच्या कविता लिहिण्यामुळे त्यांच्या पतीने त्यांची हत्या केली. त्यांच्या मृत्यूद्वारे नादिया यांनी अफगाणिस्तानच्या महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या कवितांचे भाषांतर झाले आहे आणि त्यावर अल्बमही तयार झाले आहेत.
 
* मलालाई काकर- लेफ्टनंट कर्नल मलालाई काकर कंधारमधील महिलाविरूद्ध गुन्हे विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी अनेक स्त्रियांना मदत केली, वाचवले, पाठिंबा दिला. त्या एका अशा कुटुंबातील होत्या जिथे त्यांचे पती आणि भाऊ देखील पोलीस खात्यात काम करत होते. कंधार पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. देशातील तपासनीस बनणाऱ्या त्या पहिल्या महिलाही होत्या. त्या लिंग आधारित हिंसाचारावर तीक्ष्ण प्रश्न उपस्थित करायच्या. 28 सप्टेंबर 2008 रोजी तालिबानच्या बंदुकधारी व्यक्तीने गोळी झाडून त्यांची हत्या केली. पण त्यां च्या धाडसामुळे अफगाणिस्तानात मोठ्या संख्येने महिला पोलीस आणि इतर सेवांसाठी येऊ लागल्या.
 
ही इतिहासाची एक झलक आहे ... पण आता जेव्हा तालिबानच्या ताब्यापासून परिस्थिती भयभीत अंत: करणाने पाहिली जात आहे, काही नावे अजूनही समोर येत आहेत .... अफगाणिस्तानचे पहिले चित्रपट दिग्दर्शक सबा सहार असो किंवा सहारा करीमी ....शबनम दावरान असो वा अफगानिस्तानच्या पहिल्या महिला गर्वनर सलीमा मजारी, शबनम खान असो वा बुशरा अलमत्वकल.. .. हे ते नावे आहेत ज्या निर्भयपणे पुढे जात आहे... हिम्मत आणि धैर्याचे झेंडे फडकावत आहे.. तालिबानच्या भीतीपुढे गुडघे टेकण्याऐवजी ते सातत्याने स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहेत.....अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता, आपण प्रार्थना करूया की ही यादी अधिक असीच.. आणि ... अधिक ...लांब असावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात चेन स्नॅचर चेन्नई पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये ठार

LIVE: वर्धा जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायत क्षेत्रात 'आपले सरकार' केंद्रे स्थापन होणार

तीन मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात रहस्यमय मृतावस्थेत आढळले

‘मनसेला शेवटचा इशारा…’,मराठी न बोलल्याने हिंदी भाषिकांना मारहाण केल्याबद्दल चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी संतप्त

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे... शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ

पुढील लेख