Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईपेक्षा सातपट मोठा हिमखंड 30 वर्षांनंतर जागेवरून सरकतोय, याचा काय धोका?

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (19:17 IST)
जोनाथन एमोस
 समुद्रात जवळपास 30 वर्षं अडकून राहिल्यानंतर जगातील सर्वात मोठा हिमखंड पुन्हा एकदा पुढे सरकत आहे.
 
हा हिमखंड 4000 चौरस किलोमीटर आकाराचा असून त्याला ए23ए असं नाव देण्यात आलं आहे.
 
हा हिमखंड ग्रेटर लंडन आणि दिल्लीसारख्या शहरांच्या तुलनेत आकाराने दुप्पट आहे, यावरूनच त्याच्या विशालतेचा अंदाज लावता येऊ शकतो.
 
1986 मध्ये अंटार्क्टिका समुद्रकिनाऱ्यापासून तो विभक्त झाला होता. पण वेडेल समुद्राच्या तळाशी आदळल्यानंतर तो त्याठिकाणी अडकला होता आणि त्याचं रुपांतर एका हिम बेटात झालं होतं.
 
गेल्या वर्षीपासून ते वर यायला सुरुवात झाली होती आणि आता हा हिमखंड अंटार्क्टिकामधून बाहेर पडणार आहे.
 
ए23ए हा हिमखंड 400 मीटर जाडही आहे. त्यावरूनच तो किती मोठा आहे याचा अंदाज लावता येईल.
 
लंडनमधील युरोपातील सर्वात उंच इमारत लंडन शार्डशी याची तुलना केली तर त्याची उंची केवळ 310 मीटर आहे. त्याचवेळी न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगची उंची 443 मीटर आहे.
 
ए23ए हिमखंड अंटार्क्टिकाच्या विशालकाय 'फिल्चनर आइस शेल्फ' चा भाग होता.
 
हा हिमखंड 'फिल्चनर आइस शेल्फ' मधून वेगळा झाला होता, त्यावेळी याठिकाणी एक सोव्हिएत रिसर्च स्टेशन होतं. त्यावरून हा किती काळापूर्वी वेगळा झाला होता, हे लक्षात येतं.
 
त्यावेळी मॉस्कोनं द्रुझनाया-1 बेसमधून उपकरणं हटवण्यासाठी ती कुठे हरवू नये म्हणून एक मोहीम आखली होती
 
पण हा हिमखंड 'फिल्चनर आइस शेल्फ' मधून तुटल्यानंतर किनाऱ्यापासून दूर गेला नाही. त्याचा खालचा भाग वेडेल समुद्राच्या तळाशी जाऊन धडकला.
 
40 वर्षांनंतर ए23ए पुन्हा का तरंगू लागला आहे?
 
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेशी संलग्न रिमोट सेंसिंग एक्पर्ट डॉ. अँड्र्यू म्हणाले, " याबाबत मी अनेक सहकाऱ्यांना विचारले. कदाचित शेल्फच्या पाण्याच्या तापमानात काही बदल झाला असेल, त्यामुळं हा पुन्हा तरंगू लागला असण्याची शक्यता आहे. पण बहुतांश जणांचं म्हणणं हेच होतं की, असं होण्याची वेळ आली होती."
 
"हा हिमखंड 1986 पासूनच तिथं थांबलेला होता. पण त्याचवेळी तो वितळतही होता. त्यामुळं अखेर तळापासून तो वेगळा झाला आणि तो तरंगायला लागला. मी 2020 मध्येच याची गती पाहिली होती."
 
ए23ए हिमखंडानं अलिकडच्या काही महिन्यांमध्ये हवा आणि सागरी लाटांमुळं गती घ्यायला सुरुवात केली आणि आता तो अंटार्क्टिका द्विकल्पाच्या उत्तर भागातून जात आहे.
 
वेडेल सेक्टरच्या बहुतांश हिमखंडांप्रमाणेच ए23ए देखिल नक्कीच अंटार्क्टिका सर्कमपोलर करंटमध्ये जाऊन मिळणार आहे. तो त्याला दक्षिण अलटांलिककडे ढकलेल.
 
‘आइसबर्ग एले’ (हिमखंडाचा मार्ग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर तो त्याला ढकलेल.
 
प्रसिद्ध संशोधक सर अर्नेस्ट शॅक्लेटन यांनी त्यांच्या बुडत्या जहाजावरून वाचण्यासाठी ज्या प्रवाहाच्या गतीचा आणि पछुआ वाऱ्यांचा वापर केला होता त्याच या आहेत. त्यांचे 'एन्ड्युरन्स' जहाज सागरी बर्फाशी धडकल्यानंतर बुडालं होतं.
 
शॅक्लेटन यांनी त्यांच्या लाइफबोटच्या मदतीनं साऊथ जॉर्जियाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या बेटावर तुम्हाला किनाऱ्यावर खूप सारे असे चपटे हिमखंड थांबलेले दिसतील.
 
काही धोका आहे का?
ब्लॉक कीलचा अर्थ म्हणजे यात ब्रिटिश ओव्हरसीज टेरेटरीतील उथळ बेटांच्या शेल्फलाचा जोडलं जाण्याची प्रवृत्ती आहे.
 
पण साधारणपणे सर्वच हिमखंड त्यातही मोठे वितळून नष्ट होतात. शास्त्रज्ञ ए23ए च्या स्थितीवर जवळून लक्ष ठेवून असतील.
 
जर हा हिमखंड साऊथ जॉर्जियामध्ये अडकला तर त्यामुळं या बेटांवर प्रजनन करणाऱ्या लाखो सील, पेंग्विन आणि इतर सागरी पक्ष्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
 
ए23ए एवढा विशाल आहे की, सागरी जीवांच्या भोजनाच्या सामान्य मार्गांना त्यामुळं फटका बसू शकतो.
 
पण हिमखंडाला धोका समजणं चुकीचं ठरेल. पर्यावरणाबाबत व्यापक दृष्टीनं पाहिलं तर त्याच्या महत्त्वाला आता अधिक स्वीकार्हता मिळू लागली आहे.
 
जेव्हा हे हिमखंड वितळतात तेव्हा ते त्यांच्यामध्ये सामावलेले मिनरल्स म्हणजे खनिजंही मुक्त करत असतात. अंटार्क्टिकाच्या तळाशी असलेल्या ग्लेशियरबरोबर ही खनिजं त्यात सामावलेली असतात.
 
सागरी अन्नसाखळीचा आधार असलेल्या जीवांसाठी ही खनिजं पोषक तत्वं ठरत असतात.
 
वुड्स होल ओशिएनोग्राफिक इन्स्टिट्यूशनशी संलग्न कॅथरीन वाकर यांचा जन्म ए23ए विभक्त झाला त्याच वर्षी झाला होता.
 
त्यांच्या मते,"हे हिमखंड अनेक दृष्टीनं जीवनदायी असतात. त्यातून अनेक जैविक गोष्टींना जन्म मिळतो. मला त्याची ओळख तशीच असून त्यामुळंच ते माझ्यासाठी खास ठरते."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर शायना एनसीने उपस्थित केले प्रश्न

राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर शायना एनसीने उपस्थित केले प्रश्न

26 विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या बसचा अपघात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने टळला

ठाण्यात उदबत्तीच्या धुरावरून वाद, हल्ल्यात 3 जखमी, आरोपींना अटक

Russia-Ukraine War: युक्रेनने रशियाच्या कझान शहरावर ड्रोन हल्ले केले

पुढील लेख
Show comments