Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी : बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी सुविचार

Webdunia
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (11:30 IST)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबर ला अकरावा स्मृतिदिन आहे. त्यांचे काही प्रेरणादायी सुविचार जाणून घेऊ या. 
* जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
 
* तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
 
* पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
 
* मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
 
* माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
 
* मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.
 
* वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
 
* एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र ही टिकेल.
 
* नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.
 
* तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.
 
* माझा प्रत्येक गुन्हा माझा विचार बनून लाखो लोकांच्या रक्तात वाहेल आणि त्या रक्तातील प्रत्येक थेंबात जिवंत राहील हा "बाळ केशव ठाकरे" 
 
* मराठी हा सन्मान आहे. मराठीला "व्हाय" विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे. 
 
* या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग कशात भिनवायचा ? म्युनिसिपाल्टीच्या नळात ?
 
* आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस... हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..
 
* चिथावणी वगैरे काही नाही. आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. आम्ही देवनार चे बोकड नव्हे. 
 
* भारतात बहुसंख्य हिंदू असताना. हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता? उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा.

































 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments