Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

#Boys/Girls Locker Room (Part 1)

प्रगती गरे दाभोळकर
शनिवार, 16 मे 2020 (13:13 IST)
दोन दिवसा पूर्वी एका मैत्रिणीचा लेख आला, नाव होतं #boys locker room , विषय फार गंभीर होता,लेख वाचून झाल्यावर मन फार खिन्न झालं आणि हा विषय पूर्णपणे जाणून घ्यायचं ठरवलं.
 
तर हे #boys locker room एक ग्रुप आहे ज्यावर काही मुलांनी फारच अश्लील आणि वाईट संवाद केले होते आणि ते व्हायरल झाले त्या मुळे लोकांना कळलं की हे 16-17 वर्षाचे मुलं आपसात बोलतात तरी काय?? हे संवाद इतके निर्लज्ज आणि स्तरहीन होते की आपल्या सारख्या साधारण लोकांना अंगावर काटा उभा राहतो, या संवादातून मुलींवर बलात्कार करण्यासाठी काही मार्ग सांगितले होते आणि तसं करणं किती सोपं आहे यावर चर्चा सुरू होती, ज्या कोणी मुली त्या मुलांचा नजरेत अपराधी होत्या , त्यांचा बद्दलचे हे संवाद होते आणि काय अपराध केला होता त्या मुलींनी तर एवढाच की त्या फार स्मार्ट होत्या, सडेतोड उत्तर द्यायचा आणि कधीतरी कोणत्यातरी मुलांना त्यांनी नाकारले होते, तर अश्या या प्रकारांनी त्यांना धडा शिकवायची तजवीज होती.
 
मी आता संपूर्ण हादरले होते, स्तब्ध झाले होते, ज्या देशात मुलींना कन्या म्हणून नैवेद्य दाखवतात, पाया पडून जेवायला घालतात तिथे काही मुलांची ही अशी विचारसरणी??? असं काय आहे की त्या कोवळ्या मुलांचे विचार असे घृणित झाले??? माझ्या घरात माझा 12 वर्षाचा मुलगा आणि 17 वर्षाचा पुतण्या आहे, एका मिनिटात काळीज चर्ररर झालं.... माझी भाची 16 वर्षाची आहे, ती पण अशीच सडेतोड उत्तर देणारी आणि फार स्मार्ट आहे, आता माझा मुलांचा विचार करून माझं ब्लडप्रेशर लो व्हायची वेळ आली होती, सुचेनासं झालं होतं!!  असं काय झालं असेल असं की ही मुलं या थराला पोहचली?????? 
 
मान्य आहे की या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात, आजच्या या आधुनिक परिवेशात मुलांना बरंच काही फार लवकर कळू लागतं, एकमेकाविषयी आकर्षक असत ते ही मान्य आहे कारण जर इतरांप्रमाणे सगळ्या विषयात प्रवीण नाही झाले तर तुम्ही मागासलेल्या समूहात ढकलले जाता पण या सगळ्याचा अर्थ असातर नाही होत की तुम्ही आपल्या मर्यादा सोडून द्या. So called मॉर्डन म्हणवणारे आपण सर्व काहीतरी विसरतोय का?? कुठे आणि काय कमी पडतंय हे या घटनेनंतर तरी जाणवायला नको का?? आज ते दिल्ली ला राहणारे होते उद्या आपल्याच शेजारच्या मुलांनी किंवा नातलगांपैकी कोणी असं वागलं तर???? 
 
हे सगळे प्रश्न मी स्वतःला विचारत होती, काहीतरी समाधान व्हावं म्हणून बहिणीला फोन केला तिला वाचलेला लेख आणि इंटरनेट वर बघितलेल्या या घटनेबद्दल सांगितलं, तर तिने जे उत्तर दिलं त्यांनी अजूनच धडकी भरली, ती बोलली की आम्ही तर अजूनच वाईट परिस्थिती पाहून राहिलो आहे,  इकडे तर फार निराळे लोकं असतात,मॉर्डनिज्म ची तर वेगळीच व्याख्या आहे, Extra marital Affair असणं हे स्टेटस सिंबल आहे, घर म्हणजे एक धर्मशाळा आहे ज्याचात आपल्या मनासारखं सगळं होत असतं, आधुनिकीकरण आता अंधानुकरण झालं आहे, परदेशातील राहणीमान तिथलं वातावरण आता महानगरांमध्ये साकारलं जात आहे, आणि या सगळ्यातून आपल्या मुलांना विलग ठेवणं म्हणजे एका आईची तारेवरची कसरत आहे!!!!
 
पण ती पुढे हे पण म्हणाली की आपण लहानपणापासून आपल्या मुलांना स्त्रियांचा किंवा  मुलींचा आदर करणं शिकवलं आहे आणि चांगल्या सवयी लावल्या आहे, चांगले संस्कार केले आहे, म्हणूनच काळजी करायची गरज नाही.
 
तिचं बोलणं ऐकून थोडंफार समाधान झालं पण पुन्हा एकदा वाटू लागलं की कोणत्या आईवडीलांनी आपल्या मुलांना संस्कार केले नसतील??? आज त्या साऊथ दिल्ली चा मुलांचे पालक पण हाच विचार करत असतील की आम्ही कुठेतरी चुकलोय...  आकर्षक असणं, मुलींबद्दल बोलणं किंवा गर्लफ्रेंड बनवणं इथपर्यंत मान्य आहे, आता महानगरांमध्ये एकत्र राहून नोकरी पण करतात सगळे, पण कोणाचाही अब्रूचे असे धिंडवडे काढायला तुम्ही स्वतःला समजता कोण???? मुलीपण परिस्थितीनुसार बदलल्या आहे त्यांना पण काहीतरी वेगळं करायचं असतं, एकटं राहून दाखवायचं असत, चांगलं करिअर करायचं असत, पण त्याचा अर्थ असा होतो का की तुम्ही असले घाणेरडे शब्द वापरून त्यांना जिरवायचं??? हे अत्यंत चुकीचं आहे, अशा विचारात रात्री झोपायला गेली तर अजिबात झोप लागत नव्हती , एक मूव्ही लावली टाईमपास करायला,आणि तो सिनेमा पाहून माझे डोळे उघडले, आणि  त्यामुळे बरंच काही स्पष्ट झालं. 
 
फेब्रुवारी 2020 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा, अत्यंत मॉर्डन आणि विकसित मानसिकतेचा द्योतक होता , हीरो जरी प्रेम करणारा होता तरी हिरॉईन चं मत अगदी स्पष्ट होतं ती सांगते की मी अत्ता 22 वर्षांची आहे कमीतकमी 5 वर्ष मी वेगवेगळ्या मुलांसोबत एन्जॉय करेन आणि आपलं करियर करेन त्यानंतर जर वाटलं तर सीरियस रिलेशनशिप चा विचार करेन, कारण तिच्या नजरेत प्रेम आणि संबंध हे करिअर साठी फार बाधक आहे!!!!
 
ते ऐकून मला कोणीतरी गालात चपराक मारल्या सारखं वाटलं, काय हे विचार??? करिअर आणि पैसा हे जरी मान्य केलं तरी 5 वर्ष मुलांसोबत एन्जॉय हे मनाला फार टोचलं. आता नजरे समोर सर्व काही येऊ लागलं, त्या boys locker room चा मुलांची मानसिकता अशी कशामुळे झाली हे कारण आता प्रकाशात येत होतं.
 
सिनेमा, मीडिया,आणि मोबाईल हे तिन्ही इतके सशक्त माध्यम आहेत की आपण कल्पना नाही करू शकत की या सगळ्याचा आपल्या मुलांचा जीवनावर आणि विचारांवर कितीतरी फरक पडत असतो, आजकाल मुलांना अभ्यास किंवा नोकरी करण्यासाठी या तिन्ही माध्यमातून सतत वावरणं गरजेचं आहे पण जितके हे माध्यम उपयोगी आहे तेवढेच घातक पण आहेत!! इंटरनेट हे त्या औषधाप्रमाणे आहे ज्याला निश्चित मात्रेहून अधिक वापरलं तर माणूस गेलाच समजा, आज सिनेमांमधून जे काही दाखवल्या जातं ते किती आणि कसं मुलांना उपयोगी आहे???  माझं अस अजिबात म्हणणं नाही की चांगले सिनेमे बनत नाही पण तुलना केली तर आधुनिक आणि परदेशी संस्कृती ला दाखवणाऱ्या सिनेमाच प्रमाण जास्त आहे, तसंच आज गूगल किंवा यूट्यूबवर नको-नको ते विषय आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत!!! हे अत्यंत चिंताजनक आहे.
 
मला एक आई या नात्याने असं फार प्रकर्षाने जाणवलं की कुठेतरी ही कारणं उत्तरदायी आहेत अशा मानसिकतेला!!! मुलांचं मन फार कोवळं असतं त्यावर जे काही कोरल्या जातं ते जन्मभराला आपली छाप सोडून जातं, अश्लील विषय, गाणी, उन्मत्तपण ह्यांनी भरलेले सिनेमे तशाच गूगल वर उपलब्ध निरनिराळ्या साईट्स मुलांचा मनावर विपरीत परिणाम टाकून राहिले आहे!! ही एक अशी समस्या आहे जी फक्त भारतातील मुलांची नाही तर वैश्विक आहे, विविध देश यावर शोध करून राहिले आहे, मोबाईल किंवा इंटरनेट याचा किती आणि कसा वापर करायचा या बद्दल जाहिरात आणि बातम्या दिल्या जातात. 
 
पण एक आई म्हणून माझं हृदय मला वारंवार सांगतं की जर अगदी लहानपणापासून मुलांना चांगले आणि वाईट यातला फरक करायला शिकवलं तर या समस्या कितीतरी पटीने कमी होतील, जीवन जगण्याची पद्धत, माणुसकी, जिव्हाळा आणि मुख्य म्हणजे मुलांवर दबाव न आणता त्याच्यांवर नियंत्रण करता आलं पाहिजे, त्यांचा मनातल्या भावना सहजपणे ओळखता आल्या पाहिजे, त्यांना जर घरी भरभरून प्रेम आणि अनुशासन दोन्ही बरोबर मिळालं तर दिल्ली सारख्या घटना होणारच नाही!! पालकांना आपली चूक लक्षात घेऊन प्रयत्न करावे लागतील, कारण बाहेर स्थिती फार गंभीर आहे!!!आज भारतात दर 15 मि‍िनिटात एका स्त्री वर बलात्कार होतोय हे फार चिंताजनक आहे आणि या सगळ्याचा मागे असलेल्या कारणांना शोधायची फार गरजं आहे.
 
" एक आई या नात्याने मी या विषयामुळे फार पोखरल्या गेली आहे, स्तब्ध झाली आहे आणि आपल्या मुलांना या सगळ्या पासून कसं वाचवायचं या साठी प्रयत्नशील आहे"
 
【पुढच्या भागात #Girls locker room आणि या समस्येवर निदानासाठी काय उपाय करू शकतो या विषयावर माझे विचार वाचा】Part 2 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख