1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनी महाराजांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्न सांपडलें ॥