Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी वाचवा जीवन वाचवा

Webdunia
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (12:46 IST)
पाणी हे जीवन आहे. हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत. पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही. सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. हे अमूल्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल. पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात. पाणी वाया जात या कडे कोणाचेच लक्ष नसते. अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात. त्यामुळे खूप पाणी वाया जात. असे करू नये. इथे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात.
 
पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार, शेती साठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर पीक पण नसेल मग आपण काय खाणार? आपल्या दैनंदिनी व्यवहार देखील पाण्यानेच होतात. पाणी आपल्या जीवनासाठी अति आवश्यक आहे माणूस आपल्या जीवनात काही नसेल तरी राहू शकतो पण प्राणवायू ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या शिवाय जगू शकत नाही पाणी प्रदूषणाच्या आजारांमुळे लोक मरण पावतात. म्हणून पाणी प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे.
 
पावसाच्या पाण्याला संरक्षित करून आपण पाणी वाचवू शकतो. आंघोळ करताना शॉवर एवजी बादलीचा वापर करू शकतो. पाण्याचे काम झाल्यावर नळ घट्ट बंद करू शकतो. झाडे लावून आपल्या पर्यावरणाला संरक्षित ठेवू शकतो. सार्वजनिक स्थळांवर वाहत असलेल्या नळाला बंद करून पण पाण्याला वाचवू शकतो. लक्षात 
 
ठेवा पाणी देवाची दिलेली देणगी आहे. त्याचा अपव्यय करू नका. पृथ्वीवर याच्या शिवाय जगण्याची कल्पना देखील करता येणं अशक्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा -पाणी नाही तर आपण नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments