Marathi Biodata Maker

अंधश्रद्धा चूक की बरोबर

Webdunia
शनिवार, 5 डिसेंबर 2020 (09:17 IST)
आजचा काळ विज्ञानाच्या असून देखील बरेच लोक अंधश्रद्धे मध्ये विश्वास ठेवतात. अशे लोक भोंदू बाबांच्या, मांत्रिकाच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावून बसतात. बायका सर्वात जास्त ह्याला बळी पडतात. आजच्या काळात अजून देखील मुला मुली मध्ये भेदभाव केला जातो. बायका देखील मुलं होण्याची इच्छा बाळगून भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकतात आणि आपले सर्वस्व गमावून बसतात. शिकलेले लोक देखील मांजर वाटेतून आडवी गेल्यावर काही क्षणी थांबतात. डावा डोळ्याला फडकणे अशुभ मानतात. प्रवासाला जाताना नदी आल्यावर त्यात नाणी फेकणे, दक्षिणे कडे पाय करून झोपू नये. या सारख्या गोष्टी अजून देखील मानल्या जातात.

आज देखील अंधश्रद्धेची बरीच कारणं आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या समस्येने वेढलेला आहे. त्यामुळे अशा लोकांना फसवणे या भोंदू बाबांना सहजच शक्य असत. कोणाला मुलं होत नाही, तर कोणाची ऑफिसात प्रगती होत नाही, तर कोणाचे व्यवसाय सुरळीत चालत नाही. काही न काही समस्याने सगळे वेढलेले आहे. या अंधश्रद्धेचे बळी शिकलेले आणि अशिक्षित दोन्ही लोक ठरतात.
 
काही काही फसवे भोंदू बाबांमुळे मुलांची बायकांची बळी देखील देण्यात येते. बरीच लोक काळा जादू करून आपला हेतू साध्य करतात. अमावास्येला केस मोकळे सोडून फिरू नये, दृष्ट लागणे,भूत बाधा होणे. अशी कारणे सांगितली जातात. काही लोक स्वतःचे चांगले करण्यासाठी लोकांची बळी देतात. याला रोखण्यासाठी सरकार ने एक कायदा काढला आहे याच्या अंतर्गत असे तंत्र मंत्र ज्यामुळे माणसाच्या जीवाला धोका आहे हे अक्षम्य दंड आहे. आज देखील बऱ्याच गावांमध्ये एखाद्या आजारी माणसाला रुग्णालयात नेण्या ऐवजी तंत्र मंत्र करून बरं करण्याचा अट्टाहास केला जातो. 
 
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 (A)नुसार प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी विज्ञान आणि मानवतावादाच्या भावनेला महत्त्व द्यावे. अंधश्रद्धा रोखण्याचे एक यशस्वी उपाय आहे की असे काम करताना कोणी ही आढळले तर आपल्याला पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे. आपल्याला शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी लघु नाट्य आणि पथनाट्य केली पाहिजे जेणे करून कोणी ही अंधश्रद्धेला बळी पडू नये. आपण सर्वांनी तर्कशास्त्र आणि विज्ञानानुसार विचार केले पाहिजे. आपली विचारसरणी तर्कसंगत असावी. सर्वानांच आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. नशीब- दुर्देव हे विधिलिखित असत. जर दुर्देव नसेल तर नशीब ओळखणे कठीण होईल. मुलीचं नसतील तर मुलांशी लग्न कोण करेल. आज देखील सर्वानांच मुलगा हवा असतो, पण ते हे विसरतात की या मुलांना जन्म देणारी देखील एक बाईचं असते.
 
अंधश्रद्धे पासून मुक्त होण्यासाठी देशातील सर्व नागरिकांना पुढे यावे लागणार. प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही समस्या असतातच  पण ह्याच्या अर्थ असा नाही की त्याला सोडविण्यासाठी आपण भोंदू बाबांच्या  आहारी जावे. प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे की असे ढोंगी,भोंदू आणि फसवे लोक पैसे उकळताना दिसल्यास त्वरितच पोलिसांना कळवावे आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. हे या देशातील सुजाण नागरिक म्हणून हे आपले कर्तव्य आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

BMC Elections निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा यांनी मतदान केले

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

BMC Elections बीएमसी निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी एक मोठी परीक्षा

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

पुढील लेख
Show comments