Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hiroshima Day : जगाला हादरवून सोडणारे दोन विस्फोट !

Webdunia
मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (08:10 IST)
Hiroshima Day : 1939 मध्ये सुरु झालं दुसरं विश्वयुद्ध ज्याच्यात युनाइटेड किंग्डम, सोव्हिएत संघ, चीन आणि युनाइटेड स्टेट्स (एलाइड शक्ती) आणि जर्मन, इटली आणि जपान (एक्सिस शक्ती), हे दोन गुट लढत होते. विनाशक फळस्वरूपात 'हिरोशिमा' आणि 'नागासाकी' सारख्या दुःखद घटनेचा जपान साक्षीदार झालं.
 
मे 1945 मध्ये जर्मन ह्यांचे आत्मसमर्पण केल्यानंतरपण जपान आता ही युद्धात सक्रिय होता. जपानने आत्मसमर्पण करावं आणि जगात आपला सर्वाधिकार स्थापित व्हावा या उद्दिष्टाने युनाइटेड स्टेट्सने हे पाऊल उचलले.
 
कमीतकमी 6 वर्ष, 1939 -1945 पर्यंत चालणार्‍या दुसरा विश्व युद्धाने ह्या जगात खूप विनाश केले होते. अशी कोणतीही वस्तू नसेल जी ह्यात प्रभावित झाली नसेल. मानवता, देश, समुदाय,लोकसंख्या, अर्थव्यवस्था, सौहार्द, मैत्री संबंध सगळं प्रभावित झालं. ह्या आण्विक हल्ल्यानंतर जगातील इतर देश राजकीय, आर्थिक आणि आण्विक श्रेष्ठता प्राप्त करण्यात लागले.
 
6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमामध्ये करण्यात आलेल्या परमाणू हल्ल्यात ज्या अणुबॉम्बचा वापर झाला होता त्याला 'लिटील बॉय' नाव दिलं गेलं होतं. रेपोर्टप्रमाणे तिथे असलेली लोकसंख्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त किंवा 135,000 लोक मारले गेले. हिरोशिमा येथे विस्फोट केल्याच्या दोन दिवसानंतर 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी येथे  
अणुबॉम्ब विस्फोटकला केले गेले. ह्या विस्फोटक ला 'फॅट मॅन' नाव दिलं गेलं होतं. इथे 64,000 लोक मारले गेले अशी माहिती देण्यात येते.
 
10 ऑगस्ट 1945 रोजी हल्ला झाल्याच्या एका दिवसानंतर जपान सरकारने आत्मसमर्पण केले.
जपानचे हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये झालेले अणुबॉम्बचे विस्फोटानंतर वर्षोवर्ष तिथले लोकं आणि त्यांच्या पिढ्या प्रभावित राहिल्या. विस्फोटाच्या काही वर्षानंतर ल्युकेमिया आणि रेडिएशन एक्सपोजरमुळे उद्भवलेल्या समस्यांमध्ये वृद्धी झाली. या घटनेनंतर ज्या महिलांनी मुलांना जन्म दिला त्यांचावर ह्याचा मोठा परिणाम मानसिक रोग, शारीरिकदृष्ट्या अक्षमता ह्या स्वरूपात झाला.
 
बॉम्ब डागण्याचे पहिले वैज्ञानिकांचा मत घेण्यात आला नाही हा त्यांचा आरोप होता आणि त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष्य न देऊन बॉम्ब टाकण्यात आले. त्यांना असा विश्वास होता की ज्या लष्कर संस्थेला मजबूत बनवायला त्यांनी हा अणुबॉम्ब बनवलं होता त्याचा वापर करण्याचे संदर्भात देखील त्यांचं मत घेतले जाणार. एका देशासाठी आपलं 
कर्तव्य पाळून एक वैज्ञानिक आपल्या कार्याबद्दल खूप समर्पित असतो पण यांना देखील त्यांच्या निर्माणाबद्दल निर्णय घ्यायचा स्वातंत्र्य मिळायला पाहिजे की नाही ? 
 
हा अणुबॉम्बच्या हल्ला आपल्याला नैतिकता आणि मानवतेच्या विचारांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो जे जागतिक स्तरावर कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी केले पाहिजे. 
काही निर्णय समुदाय, राजकारण, देश ह्यांच्यावर जाऊन नैतिक मूल्यांना प्रधानता देऊन मानवतासाठी नको का घ्यायला?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments